Photo : इथं पार्क करा, रस्ता आपलाच आहे !

एमजी रोडवर ट्रॅफिक जॅम, रस्ता खोदण्याच कामही सुरू
Photo : इथं पार्क करा, रस्ता आपलाच आहे !

नाशिक | Nashik

एमजी रोड (MG Road) वर नेहमीच होणारी वाहतूक कोंडी (Traffic Jam) आजही पाहायला मिळाली. या ठिकाणी असलेल्या पक्ष कार्यालयात (Party Office) मिटिंग साठी आलेल्यांनी वाहने रस्त्यांवरच पार्किंग (Road Parking) केल्याने ट्रॅफिक जॅम झाला.

एमजी रोड हा वर्दळीचा भाग आहे. या ठिकाणी विविध कार्यालये, मोबाईल शॉप्स (Mobile Shops) आणि मेनरोडकडे (Main road) जाणारा मुख्य मार्ग असल्याने येथे नेहमीच कोंडी पाहायला मिळते. आज दुपारच्या सुमारास येथील पक्ष कार्यालयात बैठक आल्याने कार्यकर्त्यांची वाहने रस्त्यातच होती. त्यामुळे इतर वाहनांना अडचण निर्माण झाल्याने साहजिक ट्रॅफिक जॅम झाला.

नाशिक शहरात वाहतूक कोंडी काही नवीन नाही. एकीकडे स्मार्ट शहर होत असताना ट्रॅफिक जॅम नित्याचाच झाला आहे. अशातच स्मार्ट रोडच्या नावाखाली महिनो महिने काम चालवले जाते. परंतु वाहतुकीला पर्याय मात्र दिला जात नाही. परिणामी वाहतूक कोंडी होते.

आता नव्याने मेहेर सिग्नल ते एम जी रोड हा २५ वर्ष जुना रस्ता खोदून नव्या रस्त्याच्या घाट घातला जातोय. त्यामुळे आता होणारी वाहतूक कोंडी पुढे जाऊन सुटणार की वाढणार असा प्रश्न व्यक्त केला जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com