
नाशिक रोड | प्रतिनिधी
देवळाली गाव येथे सध्या श्री म्हसोबा महाराजांची यात्रा सुरू असून या यात्रेचा आज दुसरा दिवस आहे, त्यातच आज सोमवार असल्याने देवळाली गाव (Deolali village) येथील आठवडे बाजार भरतो त्यामुळे देवळाली गावात मोठी गर्दी वाढली.
दरम्यान, येथील सर्व रस्ते भाविकांनी तसेच बाजारात खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेले. परिणामी या गर्दीमुळे आर्टिलरी सेंटर (Artillery Center) रोडवर असलेल्या कपालेश्वर चौकात वाहतूक (Traffic) कोंडी झाली होती.
सुमारे अर्धा ते एक तास चारही बाजूने वाहनांच्या गर्दीने रस्ता व्यापून गेल्याने परिसरात वाहनाच्या लांबच लांब रंग लागल्याचे निदर्शनास आले.