सप्तशृंगी गडावर वाहतूककोंडी; भाविकांसाठी डोकेदुखी

सप्तशृंगी गडावर वाहतूककोंडी; भाविकांसाठी डोकेदुखी

सप्तशृंगीगड । वार्ताहर Saptshrungi Gadh

श्रीक्षेत्र सप्तशृंगीगड हे आद्य शक्तिपीठ व पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी गुजरातसह महाराष्ट्र, मध्य प्रदेश येथून भक्त मोठ्या प्रमाणावर आई भगवतीच्या दर्शनासाठी येतात. पण पोलीस चौकीच्या गेटसमोर किंवा पोलीस चौकी असलेल्या चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी Traffic congestion होत असल्याने वाहनधारकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. सप्तशृंगीगडावरील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी कळवण पोलीस स्टेशन याची आहे, मात्र पोलिसांची कर्मचारीची संख्या कमी असल्याने त्याचा परिणामही वाहतुकीवर होत आहे.

शाळांना सुट्ट्या असल्याने गडावर गुजरातसह महाराष्ट्रातील भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने रोप वे गेट, पोलीस चौकीजवळील चौक, बसस्थानक आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते.

पण दोन पोलीस कळवण पोलीस स्टेशनअंतर्गत गडावर बंदोबस्तासाठी असतात पण तेही अपुरे पडत असल्याने गर्दी नियंत्रणात आण्यासाठी त्यांची धावपळ होते. सप्तशृंंगीगड हे तीर्थक्षेत्र असल्याने रोज भाविकांची वर्दळ असते. तसेच 10 कि.मी.चा घाट असल्याने या ठिकाणी लहान-मोठे अपघात घडत असतात. या ठिकाणी सतत पोलीस असणे गरजेचे आहे. गडावर पोलिसांची संख्या वाढवणे गरजेचे आहे.

दोन पोलिसांना गडाची जबाबदारी असून ते नांदुरी येथेच थांबतात व काही घडल्यावर गडावर येतात. त्यामुळे गडावर पोलीस असणे गरजेचे आहे. नुकतेच गडावर पाच ते सहा दिवसांपूर्वी एक वाहन जाळण्याचा प्रकार घडला. तो पण पोलीस चौकीशेजारीच हाकेच्या अंतरावर. तसेच सप्तशृंगीगडावरील परिस्थिती बघता देवी संस्थानने 10 ते 12 लाख रुपयांची पोलीस बांधून दिली पण तीही फक्त शोभेची वास्तू बनली आहे.

भाविक भक्ताची मोठया प्रमाणावर वर्दळ चालु असते तसेच गडावर मंदिरात लहान मोठ्या चोरीचे प्रकारचा घडत असतात या पार्श्वभूमीवर पोलीस चौकीत तक्रार दाखल करण्यासाठी गेले पण ती बंद अवस्थेत दिसली ती चालु असणे गरजेचे आहे

- समीर कुलकर्णी, भाविक कल्याण

वाहन धारकासाठी अडचणीचा सामना

रोप वे व पोलीस चैकी या चौकात मोठया प्रमाणावर वाहतुक कोडी होत असते सदर कोंडी मुळे पायी जाणारे भाविक किवा इतर वाहनांना अडचणी सामोरे जावे अपुरी पोलीस कर्मचारी असल्याने याचा परिणाम वाहतुक वर पडतो .

Related Stories

No stories found.