रानभाजी
रानभाजी
नाशिक

पेठ तालुक्यात रानभाज्याची रेलचेल

रोजच्या आहारात पसंती

Gokul Pawar

Gokul Pawar

पेठ | Peth

तालुक्यात पावसाने उघडीप दिली असली तरी परिसरात विविध प्रकारच्या रानभाज्या फुलू लागल्या आहेत. त्यामध्ये औषधी गुणधर्म असल्याने रोजच्या आहारात नागरिकांकडून पसंती दिली जात आहे.

जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर विविध प्रकारच्या रानभाज्यांसाठी पोषक वातावरण निर्माण होऊन त्यांची वाढ झाली. येथील जंगल, शिवार आणि मोकळ्या जागांवर उगवणाऱ्या रानभाज्यांच्या ठिकाणांविषयी माहिती स्थानिकांना असून, त्यांचा आकार, रंग, फुले आदींवरून त्या ओळखून गोळा केल्या जात असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, आदिवासी भागातील नागरिक रोजच्या रानभाज्यांच्या उपयोग करताना दिसत आहेत. यात कुरडु , कवळी , अंबाडी या भाज्या रानोमाळ विपूल प्रमाणात आढळून येतात. कुठल्याही लागवडी शिवाय वाढणाऱ्या या भाज्या केवळ गरम पाण्यातून वाफवून पिळूण घेऊन कांदा, हिरवी मिरची मिठ घालून बनविल्या जातात

.गेल्या वर्षीच्या तुलनेत या भाज्यांच्या दरात वाढ झालेली दिसते, परंतु त्यामध्ये औषधी गुणधर्म असल्याने करोना काळात त्या आवर्जून खरेदी केल्या जात असल्याचे ग्राहकांकडून सांगण्यात आले.

.

Deshdoot
www.deshdoot.com