वाल्मिकनगरचा पारंपरिक राम जन्मोत्सव

वाल्मिकनगरचा पारंपरिक राम जन्मोत्सव

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोनासारख्या वैश्विक संकटामुळे सुमारे दोन वर्षांपासून अनेक पारंपरिक यात्रा- उत्सवांना ब्रेक लागला होता.मात्र,सध्या करोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे कमी झाल्याने शासनाने सर्व निर्बंध हटविले आहेत.त्यामुळे यंदा सर्वच सण उत्सव ( Festivals ) जल्लोषात साजरे होत असून, 75 वर्षांची परंपरा असलेला पंचवटीतील वाल्मिकनगरमधील ( Walmik Nagar- Panchavati ) श्रीराम जन्मोत्सवही ( Shri Ram Janmostav )दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यंदा साजरा होत आहे. प्रथेनुसार गुढीपाडव्यापासून (दि.2) विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली असून, श्रीरामनवमीला (दि.10) समारोप होणार आहे.

पंचवटीतील वाल्मिकनगरमध्ये स्वातंत्र्यपूर्वकाळापासून प्राचीन श्रीराम मंदिर असून, त्यास कुष्ठपीडितांचे राम मंदिर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते. मंदिराच्या जीर्णोद्धाराला मंगळवारी (दि.29) रोजी 61 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त वर्धापन दिनही साजरा करण्यात आला. त्यानिमित्त आयोजित भंडार्‍याचाही परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे लाभ घेतला.स्वातंत्र्यपूर्व काळापूर्वी पंचवटीतील वाल्मिकनगरमधील मजुरवाडी या भागात जवळपास सातशे ते एक हजार कुष्ठपीडित राहत असत.

या सर्व कुष्ठपीडित कुटुंबांसाठी श्रीराम पंच मंडळ हे काम करीत असत. या मंडळाचे प्रमुख म्हणून तत्कालीन सरपंच राघोशेठ तांबे होते. त्याकाळात कुष्ठपीडित हे देवदर्शनासाठी कुठे बाहेर जात नसत. त्यामुळे तेव्हा काही लोकांनी एकत्र येऊन कुष्ठपीडितांच्या वस्तीत एका पत्र्याच्या शेडमध्ये श्रीराम मंदिर उभारले होते.

पुढे श्रीराम पंचमंडळाचे सरपंच राघोशेठ तांबे यांनी पुढाकार घेत पै, पाच, दहा, वीस, पंचवीस पैशापासून ते अगदी दहा वीस रुपयांपर्यंत वर्गणी जमा करून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. महाराष्ट्रासह पंजाब राज्यात असलेल्या कुष्ठपीडितांच्या 42 वसाहतींपैकी प्रथमत: नाशिक येथील कुष्ठ पीडितांच्या वसाहतीत श्रीराम मंदिराची उभारणी झालेली आहे. त्यानंतर अन्य वसाहतींमध्ये श्री दत्तात्रय, हनुमान,विठ्ठल रुक्मिणी मंदिर अशी अन्य देवतांच्या मंदिरांची उभारणी करण्यात आली आहे.

श्रीराम जन्मोत्सवानिमित्त गुढीपाडवा ते रामनवमीपावेतो परंपरेनुसार अखंड वीणावादनही होणार आहे. तसेच क्रिकेटसह विविध स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या आहेत.

Related Stories

No stories found.