पारंपारिक वस्तू नामशेष होण्याच्या मार्गावर; कारागिरांची उपासमारीची वेळ

पारंपारिक वस्तू नामशेष होण्याच्या मार्गावर; कारागिरांची उपासमारीची वेळ

उमराळे बु.। संतोष खरे | Umrale

पाटे, वरवंटे आणि जाते आता जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पण तरीही प्रपंचाचे ओझे सांभाळत पोटापाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी काही कुटूंबांना गावोगावी फिरून हा व्यवसाय करण्याची येत आहे.

असेच एक कुटूंब भास्कर धोत्रे, मवाडी (धुळे) येथून आलेले गावोगावी फिरून हा पाटे वरवंटे व जाते विकण्याचा व्यवसाय नाईलाजास्तव करतांना दिसत आहे. आई वडीलांनी लहानपणी कोणत्याही शाळेत (shcool) टाकले नाही.

त्यांच्या बरोबरच लहानपणापासून गावोगावी फिरतांना शिक्षणाचा (education) गंध व आवडच राहीली नाही. कारण शिक्षणा पेक्षा पोटाचा प्रश्न तेव्हा ही होता आणि आजही मोठाच आहे. पत्नी, तीन मुली, एक मुलगा, घरी आईवडील आणि सोबतीला मदतीसाठी दोन गाढवं असा कुटुंबाचा लवाजमा सांभाळत गावोगावी फिरून हा व्यवसाय करावा लागतो.

लोक येता फटू काढता मोबाईल (mobile) वर टाकता पण कोणत्याच प्रकारची मदत कोणीच करत नाही असे भास्कर धोत्रे यांनी सांगितले. गावोगावी फिरून अशा ऐन दिवाळीत (diwali) सुद्धा घरी गावी जाता येत नाही. मुलांनी हा कामधंदा करू नये, यासाठी अडाणी असून सुद्धा मुलांना शिकवण्याचा अट्टाहास आहे. मुलांनी शिकून नोकरी (job) करावी पण कामधंदा (business) करू नये असे या व्यावसायिकांना मनापासून वाटते. घरी शेती नसल्यामुळे याच व्यवसायावर गुजराण करावी लागते.

पावसाळ्याचे (monsoon) चार महीने गावी राहून दगडं गोळा ठेवावे लागतात व उर्वरीत आठ महिने गावोगावी फिरून उदरनिर्वाह करावा लागतो. सर्व सणवार बाहेरच होतात पण सण साजरे कराय पुरते सुद्धा पैसे नसतात फक्त दोनवेळचे जेवण मिळेल हीच अपेक्षा. सरकार कडून कोणतीही अपेक्षा नाही कारण इतक्या वर्षात किती सरकार आले आणि गेले पण आजपर्यंत काहीही मदत मिळाली नाही. शेती नसल्या कारणाने आधीच्या पिढ्यांपासून सर्वच हा व्यवसाय करत आलेले आहेत. शिक्षण (education) नसल्यामुळे शेती करण्याची खूप इच्छा आहे. परंतु शेतीच नाही हे एक मुख्य कारण गावोगावी फिरण्याचे आहे.

शेती असती तर इतके हलाखीचे जीवन काढले नसते. ज्यांना खरोखर जीवनावश्यक वस्तूंची गरज आहे त्या त्यांच्या पर्यंत पोहचत नाहीत . तसेच भूमीहिनांना जमीन देत नाही . जेणेकरून आमचा उदर निर्वाह चांगला होईल. मतदान (voting) जवळ आले की राजकारणी लोक आमचा शोध घेत घेत स्वतः घ्यायला येतात किंवा भाड्या पुरतेच पैसे पाठवतात नंतर निवडून आले का कधीच विचारत सुद्धा नाहीत, अशी खंत यांनी बोलून दाखवली. दिवाळीचा सण (diwali festival) चालू आहे पण एकाही पोराला लत्ता नाही की बायकोला एखादी बरी माठी साडी सुद्धा घेण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत फक्त जगण्या पुरते पैसे मिळतात.

त्यात घरी पण पैसे पाठवावे लागतात कारण घरी शेती किंवा इतर कोणताही व्यवसाय नसल्या कारणाने सर्व यावरच अवलंबून आहे. काही समाज सेवक येतात काहीतरी देतात. प्रसिद्धीसाठी मोबाईलमध्ये फोटो काढतात आणि सोशल शेअर करतात. हे कितपत योग्य वाटते ? मराठीत म्हण आहे की दान द्याव पण ह्या हाताच त्या हाताला कळता कामा नये परंतु आजच्या या युगात माणूस सोशल मिडीयाच्या (social media) माध्यमातून जगजाहीर करतो की मी किती दानशूर आहे. खरोखर अशा नामशेष होत चाललेल्या वस्तू जे कारागीर घडवतात त्यांची पोटापाण्यासाठी चाललेली तगमग अस्वस्थ करणारी आहे.

कदाचित या पिढीनंतर अशा वस्तू बनवणारी पुढची नसेलच आणि गरीबांचा मिकसर म्हणून आजही पाटा वरवंटा घरोघरी बघायला मिळतो . लोक आजही म्हणतात पाट्यावरची वाटलेल्या चटणी ची चव इलेक्ट्रीक मिकसरला कधीच येणार नाही. जाते नामशेष होत चालले तर जात्यावरच्या ओव्या पण आपसुकच नामशेष होत जातील आणि ओव्या निमित्ताने जात्याभोवती रत्रीयांचा होणारा गराडा सुद्धा हळूहळू कमी होत जाईल आणि होत चालला. विज्ञानाने खूप प्रगती केलीय , खूप सार्‍या मशिनरी आल्यात पण आजही लग्नघरी जात्या शिवाय हळद दळली जात नाही .

त्या निमित्ताने का होईना स्त्रीया एकत्र येतात गाणे व ओव्या म्हणतात. आज मोबाईल चा जमाना आहे कोणालाही बोलायला वेळ मिळत नाही त्या मुळे विचारांची देवाण घेवाण होत नाही. जुन्या अशा किती तरी गोष्टी आहेत की त्या निमीत्ताने लोक आजहीएकत्र येतात व त्यातूनच विचारांची देवाण घेवाण होते. त्यातूनच पाटा वरवंटा , जाते यांसारख्या गोष्टी आहेत.

पूर्वी लग्नाघरी पाट्यावर नैसर्गिक मेहंदी वाटली जायची. आज आपण सर्व रेडीमेड केमिकल मेहंदीचा वापर करतो. हे सर्व या कामगारांमुळेच परंतु जगण्यासाठी काहीतरी करावेच लागते. या कामात खूप मेहनत लागते. एक जाते बनवायला साधारणतः तीन दिवस जातात. पण या तीन दिवसांच्या मानने त्याची विक्री पाहिजे त्या किमतीत होत नाही. त्यामुळे कमी पैशात विकून त्यांना गुजरान करावी लागते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com