मंगळागौर महोत्सवात पारंपरिक खेळ

मंगळागौर महोत्सवात पारंपरिक खेळ

घोटी। वार्ताहर Ghoti

इगतपुरी तालुक्यातील ( Igatpuri Taluka )घोटी शहरात महाराणा प्रतापनगर येथे पहिल्यांदाच मंगळागौर महोत्सवाचे आयोजन ( Mangalagaur Mahotsav )करण्यात आले होते. यामध्ये पिंगा, दंड फुगडी, एक हाताची फुगडी, कमळ फुगडी, सासू - सुनेची आराधारी, सूप, कळशी, करवंटी खेळ तर संगीत खुर्ची, लंगडी, चमचा लिंबू, तळ्यात-मळ्यात ह्या स्पर्धा घेण्यात आल्यात. यात 300 महिलांनी सहभाग घेतला.

स्पर्धेसाठी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली होती. श्रावणात आरोग्याच्या दृष्टीने तसेच शारीरिक सक्षमीकरणासाठी महिलासांठी विविध खेळ खेळल्या जातात याकरीता घोटी शहरातील महाराणा प्रतापनगरात ग्रामपालिका सदस्य स्वाती हिरामण कडू यांनी मंगळागौर महोत्सवाचे आयोजन माऊली मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. आपली संस्कृती जोपासण्यासाठी हा महोत्सव घेण्यात आला असल्याचे आयोजक स्वाती कडू यांनी सांगितले.

संगीतखुर्ची स्पर्धेत प्रथम पारितोषिक-भूमिका कडू द्वितीय मनीषा दीपक भोर, चमचा लिंबू स्पर्धेत रोहिणी म्हसने प्रथम तर द्वितीय गायत्री तोकडे विजेत्या झाल्या. पिंगा स्पर्धेत 65 वर्षीय ज्येष्ठ महिला हौसाबाई मोहन भगत यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तळ्यात- मळ्यात स्पर्धेत पूजा भटाटे, करवंटी खेळात - नम्रता पाबळकर, लंगडी खेळात - सुवर्णा तोकडे, लहान गटात फुगडी मध्ये - क्षितिजा, त्रिषा विजयी झाल्यात. यामध्ये परितोषिकांमध्ये पैठणी साडी आणि स्मृतिचिन्ह देण्यात समावेश होता. यावेळी शिवसेना महिला आघाडी शहरप्रमुख स्वाती हिरामण कडू, दीपाली गणेश काळे, पूजा विक्रम मुनोत आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com