29 ऑगस्टला शेतकरी, वीजबिल कायद्याविरोधात ट्रॅक्टर रॅली

29 ऑगस्टला शेतकरी, वीजबिल कायद्याविरोधात ट्रॅक्टर रॅली

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

नाशिकरोडच्या बाजार उपसमितीत केंद्राच्या शेतकरी आणि वीजबील कायद्याविरोधात (Farmers and Electricity Bill) विविध संघटना व पक्षांची बैठक झाली...

शेतकर्‍यांना विश्वासात न घेता केंद्र सरकारने (Central Government) मनमानी करत कृषी कायदे आणले आहेत. हे कायदे व्यापार्‍यांच्या हिताचे आहे. त्या विरोधात नाशिक जिल्हा शेतकरी समन्वय समितीतर्फे 29 ऑगस्टला ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरवण्यात आले.

भारत कृषीप्रधान देश असून 65 टक्के लोकसंख्या शेतीवर आधारीत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना विश्वासात घेऊन कृषी कायदे करायला हवेत. आठ महिन्यापासून अनेक शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहेत. पंतप्रधानांनी त्यांची भूमिका जाणून घेऊन त्वरित उपाययोजना करावी, अशी भूमिका खा. हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी मांडली.

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा केंद्राने आदर करावा, असे मत आ. सरोज आहिरे (Saroj Ahire) यांनी व्यक्त करून वैयक्तिक 21 हजार रुपये रॅलीसाठी देण्याचे जाहिर केले. दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांना पाठिंबा देण्यासाठी नाशिकमध्ये रस्ता रोको, धरणे आंदोलन करण्यात आले.

आता शहरातून शेतकर्‍यांची ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे. त्यात जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दत्ता गायकवाड यांनी केले. निवृत्ती अरिंगळे यांनी शेतकरी रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी आ. दिलीप बनकर, शिवसेना उपनेते बबनराव घोलप, सुधाकर बडगुजर, नितीन ठाकरे, शरद आहेर, विजय करंजकर, सुनिल बागुल, योगेश घोलप, कृष्णा भगत, प्रभाग सभापती प्रशांत दिवे, नगरसेवक जगदिश पवार, गोरख बलकवडे, राजु देसले, बाबुराव मोजाड, राजेंद्र डोखळे, राजाराम धनवटे, बाळासाहेब पिंगळे, शशिकांत उन्हवणे, तानाजी जायभावे, अशोक सातभाई, मनोहर कोरडे, पुंडलिक आरिंगळे, वसंत आरिंगळे, विक्रम कोठुळे आदी उपस्थित होते.

बैठकीचे संयोजन अशोक खालकर, रमेश औटे, सुदाम बोराडे, मधुकर सातपते, शिवजी म्हस्के, नामदेव बोराडे, केशव पोरजे यांनी केले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com