ट्रॅक्टर उलटून होऊन एक ठार; दोन जखमी

ट्रॅक्टर उलटून होऊन एक ठार; दोन जखमी

नांदगाव । Nandgaon (प्रतिनिधी)

नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज येथील गणेशनगर येथे शेतात ट्रॅक्टर पलटी होऊन एक ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

माणिकपुंज येथील गणेशनगर शिवारात शिवाजी सानप यांच्या शेतातील ड्रीपने झाडांना पाणी देत सदरचा ट्रॅक्टर क्रमांक एम. एच. ई. एस. 3682 नाल्याच्या कडेने जात असतांंना पलटी झाल्याने अपघात झाला.

या अपघातात मजूर गंगाराम पुडलींक मेंंगाळ (17) जागीच ठार झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे.

मजूर सनीराम गोविंद मेंंगाळ व एकनाथ वाल्मिक मेंगाळ हे दोन्ही गंभीर जखमी झाले असून खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरुन फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

याप्रकरणी पोलिसांत भादवी 279, 306 (अ), 337, 338 अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पो. हवा. श्रावण बोगीर करीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com