20 वर्षांपासून प्रलंबित रस्ता डांबरीकरण पूर्णत्वाकडे

20 वर्षांपासून प्रलंबित रस्ता डांबरीकरण पूर्णत्वाकडे

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

माजी नगरसेवक पंकज मोरे (Former corporator Pankaj More) यांच्या पाठपुराव्याने प्रभाग क्र. 12 मधील समर्थ नगर भागातील रस्त्यांच्या डांबरीकरणास (Asphalting) नुकताच प्रारंभ करण्यात आला. गेल्या 20 वर्षांपासून असलेली नागरिकांची मागणी पूर्ण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

प्रभागातील विविध विकासकामांसाठी मोरे यांच्याकडून माजी आमदार राजाभाऊ वाजे (Former MLA Rajabhau Waje) यांच्याद्वारे खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. गेल्या 20 वर्षांपासून या प्रभागात अनेक कामे प्रलंबित होते. मात्र, नगरसेवक मोरे यांच्या प्रयत्नाने या भागात अनेक विकासकामांना चालना मिळाली.

अनेक रस्त्यांचे डांबरीकरण (Asphalting of roads), भूमिगत गटारी (Underground sewers), स्वच्छता, पिण्याची पाण्याची समस्या त्यांनी स्वतः उभी राहून करून घेतली. समर्थ नगर भागातील रस्त्यांचे डांबरीकरण व्हावे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. मागील पाच वर्षांपूर्वीच्या लोकप्रतिनधिंकडून यासाठी कुठलाही प्रयत्न करण्यात न आल्याने नागरिकांमध्ये असंतोष होता. मात्र, मोरे यांनी आपल्या कार्यकाळात प्रभागाचा चेहरा-मोहरा बदलवण्यात मोठा हातभार लावला.

माजी आ. वाजे व खा. गोडसे यांनी यासाठी मोलाची मदत करत सुवर्णजयंती नगरौउत्थान योजनेअंतर्गत प्रभागासाठी तब्बल 2 कोटींचा निधी मिळवून दिला. यातुन प्रभागातील यशवंत नगर, मॉडर्न कॉलनी, खंडेराव महाराज मंदिर परिसर, दत्त मंदिर परिसर, सिद्धिविनायक सोसायटी, पांडव नगरी व समर्थ नगर भागात भूमिगत गटार, पथदिवे, हायमास्ट, रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे पार पडली.

नुकतेच समर्थ नगर भागातीलच राहिलेल्या रस्त्यांच्या डांबरीकरणास सुरुवात झाल्याने संपूर्ण प्रभागातील रस्त्यांचे डांबरीकरण झाले आहेत. पंकज मोरे यांनी स्वतः उभे राहून रस्त्याचे डांबरीकरण करून घेतले. त्यामुळे नागरिकांनीही समाधान व्यक्त करत त्यांच्यासह माजी आ. वाजे यांचे आभार मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com