ठाणगाव । Thangoan

गुजरात-महाराष्ट्र सरहद्दीवर असलेले सापुतार्यातील हिल स्टेशनला पर्यटकांची गर्दी वाढली आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून सापुतारा येथे नाताळच्या व 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सलग चार - पाच दिवस सुट्टी असल्याने सापुतारा येथे पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. लहान मोठ्या व्यवसायांना रोजगार उपलब्ध झाले आहे.

छोटे-मोठे स्टॉल, लाँज, हॉटेल आदींना अच्छे दिन आल्याचे व्यावसायिकांनी सांगितले आहे. हे हिल स्टेशन थंड हवेचे ठिकाण असल्याचे पर्यटक पिंकनिकसाठी मोठ्या प्रमाणात येत असतात.

बोंडिग पाँरगलाँडिग, घोडेस्वारी, घोडागाडी, बाईकस्वार , रोजगार्डन, नागेश्वर मंदिर, सांई मदिंर, गणपती मंदिर, ईको पाँईट, सनशेट पाँईट, सनराईस पाँईट, रोपे, असा प्रकारचे फिरण्यासाठी धार्मिक स्थळे असल्याने सापुतारा हे महाबळेश्वरबरोबर प्राख्खात झाले आहे.