पर्यटक
पर्यटक
नाशिक

करोना काळात गडकिल्ल्यांवर पर्यटकांची गर्दी

पर्यटकांकडून नियम धाब्यावर

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक | Nashik

गेल्या चार महिन्यांपासून राज्यासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी लॉक डाऊन करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी ठिकाणी शिथिलता देण्यात आली आहे. असे असले तरी कोरोना काळात जिल्ह्यात अनेक गडकिल्ल्यावर पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे. तसेच नियमाचे उल्लंघन होत असल्याचे स्थानिक दुर्गसंवर्धकांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

दरम्यान करोन काळात सार्वजनिक ठिकाणी तसेच प्रतिबंधित संक्षेत्रात जाण्यास मनाई करणयात आली आहे. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत असले तरी विनाकारण अनेक नागरिक घराबाहेर पडताना दिसतात.

अशातच पावसाळयाचे दिवस असल्याने अनेक पर्यटन स्थळे खुलली आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या ठिकाणांवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. परंतु हौशी पर्यटक नियमांना पायदळी तुडवत सर्रास किल्ल्यावर गर्दी करताना दिसून येत आहेत. हरिहरसह जिल्ह्यातील हतगड व रामशेजवर शनिवार, रविवारी नागरिकांच्या झुंडीच्या झुंडी किल्ल्यावर बिनधास्त वावरत यामुळे प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेने केली आहे.

गडकिल्ल्यांसह वनक्षेत्र, धार्मिक स्थळांना पर्यटनाच्या ठिकाणी जाण्यास शासकीय आदेशान्वये बंदी आहे. त्यामुळं जिल्ह्यातील विविध भागांतील गडकिल्ल्यांवर सुरू असलेल्या दुर्गसंवर्धन संस्थांच्या मोहिमा या बंदीमुळे स्थगित आहे. परंतु पर्यटक नियमांना पायदळी तुडवत किल्ल्यावर जात असल्याने यावर तात्काळ उपाययोजना करावी.

- राम खुर्दळ, शिवकार्य गडकोट दुर्ग संवर्धन संस्था

Deshdoot
www.deshdoot.com