पांडवलेणीवर पर्यटक पाय घसरून पडले; अथक प्रयत्नाअंती 'अशी' केली सुटका

पांडवलेणीवर पर्यटक पाय घसरून पडले; अथक प्रयत्नाअंती 'अशी' केली सुटका

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पांडवलेणी (Pandavleni) येथे पाय घसरून पडलेल्या पर्यटकाला (Tourists) आणि त्यांच्या मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात गिर्यारोहकांना मोठे यश आले आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईचा एक परिवार सकाळी पांडवलेणी (Pandavleni) परिसरात फिरण्यास आले होते. त्यातील एक व्यक्ती पाय घसरुन पडला. तो व्यक्ती आणि त्याचा हातातील मुलगी दोघेही जखमी झाले.

त्या व्यक्तीने मुंबईत असलेल्या त्याच्या नातेवाइकांना कळवले व नातेवाईकांनी महाराष्ट्र माऊटेनिअर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरचे राहुल मेश्राम यांच्याशी संपर्क केला.

राहुल मेश्राम यांनी नाशिक क्लाईंबर्स अंँड रेस्क्यूअर्स असोसिएशन (NCRA) टीमला कळवले व परिस्थीतीचे गांभीर्य लक्षात घेता लगेचच नाशिक क्लाईंबर्स अंँड रेस्क्यूअर्स असोसिएशनची पहिली टीम घटना स्थळी पोहचली.

तेथील जखमी व्यक्तीची परिस्थिती बघता स्पाईनल स्ट्रेचर मागवण्यात आली. व्यक्तीच्या कमरेला मार असल्याने स्पाईनल स्ट्रेचर, रोप, आवश्यक वस्तू घेवून दूसरी टीम पोहचली. त्या व्यक्तीला सुमारे तीन तासांनी पांडवलेणी पायथ्याशी आणण्यात आले. आणि रुग्णवाहिकेतू त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

‌इंदिरानगर सीआर मोबाइल इंचार्ज रविराज भांगरे (Raviraj Bhangare), चालक निवृत्ती माळी, आनंदनगर बिट मार्शल संदीप लांडे व भावराव गवळी हे देखील तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी ‌नाशिक क्लाईंबर्स अंँड रेस्क्यूअर्स असोसिएशनचे निलेश पवार, ओम उगले, अभिजीत वाघचौरे, ऋषिकेश वाघचौरे, अजय पाटील, आदित्य फाळके, चद्रकांत कुंभार, मुकूल वांद्रे, वेदांत वाणी, अक्षय गाडगीळ, सारंग बापटे यांनी सहकार्य केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com