घोटी । Ghoti

इगतपुरी तालुक्यातील मोरधन किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटक पाय घसरून पडल्याने दुखापत झाली. यावेळी त्यास तात्काळ स्थानिक गिर्यारोहकांनी खाली उतरवत प्राथमिक उपचार केले.

नववर्षाच्या पहिल्या आठवड्यातच मुंबई परिसरातून असंख्य पर्यटक इगतपुरी तालुक्यात पर्यटनाचा आनंद घेत आहे. मुंबईचे काही युवक पर्यटक मोरधन किल्यावर पर्यटन व ट्रेकिंगसाठी आले होते.

यातील आशय कुरुसकर हा किल्ल्यावरून खाली उतरत असताना उडी मारण्याच्या प्रयत्नात असतानाच पाय घसरला. यात त्याच्या पायाला दुखापत झाली. ही बाब घोटीच्या कळसुबाई मित्र मंडळाच्या घोटीतील गिर्यारोहकांना समजताच त्यांनी तात्काळ धाव घेऊन मदतकार्याला सुरुवात केली. संकटात सापडलेल्या पर्यटकाला सुखरूप बाहेर काढले.

ही बाब घोटी येथील कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांना समजताच गिर्यारोहक संतोष म्हसने ,बाळू आरोटे ,प्रशांत जाधव ,प्रविण भटाटे यांनी धाव घेऊन रेस्क्यू ऑपरेशन करून गंभीर दुखापत झालेल्या पर्यटकाला सुखरूप किल्ल्यावरून खाली आणून घोटी येथे रुग्णालयात दाखल केले. तात्काळ सेवा दिल्याबद्दल पंचक्रोशीत मंडळाच्या गिर्यारोहकांचे कौतुक होत आहे.