किल्ले रामशेजवर पर्यटकांची हुल्लडबाजी, थांबवणार कोण?

किल्ले रामशेजवर पर्यटकांची हुल्लडबाजी, थांबवणार कोण?

दिंडोरी | Dindori

करोना काळात (Corona Crisis) जिल्हाप्रशासनाने पर्यटन स्थळ (Tourist Place), किल्ले यावर जाण्यास मज्जाव केला असतांना प्रशासनाच्या आदेशाला झुगारून किल्ले रामशेजवर (Ramshej Fort) पर्यटकांची बेसुमार गर्दी असते. या ठिकाणी वनविभाग दिंडोरी (Dindori Forest Department) , पोलीस यंत्रणा व स्थानिक ग्रामस्थांचे दुर्लक्ष होत असल्याने पर्यटकांचे फावले आहे.

दरम्यान वेळोवेळी सूचना देऊनही पर्यटक मनमानी करतांना दिसून येत आहे. यावर आळा कधी बसणार? तसेच किल्ल्यावर अनेक दुर्घटना घडत असतांना पर्यटकांना काहीच कसे वाटत नाही, यावर वेळीच पोलिसांनी कठोर पावले उचलून कारवाई करणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील अनेक संस्था, संघटना याबाबत आवाज उठवत असतात. अनेक ठिकाणी जनजागृती (Awairness) केली जाते. परंतु या सर्वांना फाट्यावर पर्यटक हुल्लडबाजी करतांना दिसून येतात. तर अनेकदा पर्यटक किल्ल्यावर बेसुमार प्लास्टिक कचऱ्याचे ढीग करून जातात. दुर्गसंवर्धनातून वाचवलेल्या ऐतिहासिक वास्तूंना, येथील पर्यावरणाला आपसूक धोका पोहोचवला जात आहे.

या संदर्भात वन, पोलीस, गाव प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करूनही याबाबत संबंधितांकडून हलगर्जीपणा, दुर्लक्ष केल जात आहे. दरम्यान एकीकडे दुर्गांचे अस्तित्व वाचवण्यासाठी दुर्गसंवर्धन संस्था जीवापाड राबतात, मात्र त्याच दुर्गांचे उरलेसुरले अस्तित्व संपवण्याचे प्रकार डोळ्यासमोर घडत आहे.

शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेने अखंडित दुर्गसंवर्धन मोहिमेच्या श्रमदानातून स्वखर्चाने दुर्ग रामशेजच्या अस्तित्वाला जोपासण्याचे संवर्धनाचे काम केले आहे. यासाठी पर्यटकांनी दुर्गप्रेमींनी, विद्यार्थ्यानी दुर्ग कसा बघावा ही दुर्गजागृती अखंडित केली आहे. त्यामुळे ऐतिहासिक वास्तू जपण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे.

- राम खुर्दळ, शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com