अवघ्या ८४ तासांत चालवली बाराशे किमी सायकल; नाशिककर टोपीवाला बंधूंचा विक्रम

अवघ्या ८४ तासांत चालवली बाराशे किमी सायकल; नाशिककर टोपीवाला बंधूंचा विक्रम

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकच्या सायकलीस्टच्या बंधूंनी (Nashik Cyclist Topiwala brothers) ८४ तासांत तब्बल बाराशे किलोमीटरचे अंतर पार करत चालुसिया राइड (chalusia cycle ride) पूर्ण केली. त्याच्या या कामगिरीने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे....

ही स्पर्धा निर्धारित वेळेच्या आधीच पूर्ण केल्यामुळे पॅरिस(paris) येथील पीपीबी (PPB) व लंडनच्या एलइएल (London LEL) स्पर्धेसाठी मुस्तफा बंधू पात्र ठरले आहेत. अशी कामगिरी करणारे डॉ. मुस्तफा टोपीवाला (Dr Mustafa Topiwala) हे देशातील पहिले फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist) के ठरले आहेत.पेशाने फिजिओथेरपीस्ट असलेल्या मुस्तफा आणी युसुफ टोपीवाला यांनी ही कामगिरी केली.

बंगलोर (Banglore) येथे आयोजित करण्यात आलेल्या चालुसिया राईड या स्पर्धेला देशभरातून ११५ रायडर्सचा सहभाग होता. स्पर्धेचा एकूणच मार्ग आणि वातावरण यामुळे पहिल्याच दिवशी जवळपास ५० रायडर्सने या स्पर्धेतून माघार घेतली होती.

मात्र टोपीवाला बंधू यांनी खड्याखुड्यांचा रस्ता तुडवत आणि प्रतीकुल वातावरणाचा कठीण सामना करत या स्पर्धेत शेवटपर्यंत टिकून राहिले.

एकूण ९० तासांत १२०० किलोमीटरचे अंतर पार करावयाचे होते. सायकल चालवितानाच कुठेतरी थोडस थांबून या खेळाडूंना जेवण, नाश्ता आणि पाणी प्यावे लागत होते.

मात्र, पहिल्या आरामासाठी खेळाडूंना तब्बल ६२० किमी अंतर पार करावे लागणार होते. त्यामुळे अनेक खेळाडू या स्पर्धेतून माघारी परतले.

ही स्पर्धा याच शहरातून सुरु झाली होती. पुढे चित्रदुर्ग मध्ये सायकलीस्टसना जावे लागले. नंतर तिथून बाहुबली चित्रपटाची शुटींग झालेल्या आणि देशातील नायगारा धबधब्यासारखा भाग असलेल्या परिसरातून जाणे मोठे आव्हानच होते.

गोकाथ परिसरातून पुन्हा परतीच्या मार्गी निघून बेळगाव हुबळी मार्गे पुन्हा बंगलोर गाठावे लागले होते.

स्पर्धेच्या रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे होते. या भागात नामांकित सिमेंटचे कारखाने आहेत, त्यामुळे येथील रस्ते प्रचंड खराब आणि आव्हान देणारेच होते.

तसेच या मार्गावर उसतोडीच्या हंगामाला सुरुवात होत होती. त्यामुळे हजारो टन उस कापून रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आला होता. यामुळे एका बाजूचा रस्ता पूर्णपणे बंद झाला होता.

म्हणून सायकल चालविताना वन वे ट्राफिक होती. त्यामुळे सायकलीचा वेग कमी झाला होता. अनेकांना या वाहतूक कोंडीचा फटकाही बसल्याचे मुस्तफा टोपीवाला यांनी देशदूतशी बोलताना सांगितले.

वेळेचे नियोजन होते आव्हान

स्पर्धेसाठी बाराशे किलोमीटरचा प्रवास १४ शहरातून केला. प्रत्येक ठिकाणचे वातावरण आणि रस्त्यांची परिस्थिती वेगवेगळी होती. यामुळे स्पर्धकांचा चांगलाच कस लागला. विशेष म्हणजे या शहरातील प्राचीन स्थळांनादेखील स्पर्धकांनी भेटी दिल्या होत्या. त्यामुळे वेळेचे नियोजन मोठे आव्हान होते.

रस्ते खूप खराब होते. वातावरणात अमुलाग्र बदल वेळोवेळी होत होता त्यामुळे परिस्थिती जुळवून घेणे हे मोठे आव्हान आमच्यापुढे होते. नियमित सरावामुळे आम्ही मागे हटलो नाही. निर्धारित वेळेआधीच ही स्पर्धा पूर्ण करण्याचा आनंद वेगळाच आहे.

डॉ मुस्तफा टोपीवाला, नाशिक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com