साम दाम दंड भेद प्रतिष्ठानतर्फे उद्या पायी रॅली

साम दाम दंड भेद प्रतिष्ठानतर्फे उद्या पायी रॅली

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

साम दाम दंड भेद प्रतिष्ठान (Sam Dam Dand Bhed Pratishthan) तर्फे अखंड भारत संकल्प समितीच्या (Akhand Bharat Sankalp Committee) माध्यमातून (१४ ऑगस्ट) पायी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास भोसला मिलिटरी शाळेच्या (Bhosla Military School) गेट नंबर २ वरून पायी रॅलीची सुरवात होऊन बि वाय के गेट मार्गे गंगापूर रोड (Gangapur Road), शहीद सर्कल मार्गे भोसला मिलिटरी शाळा येथे विसर्जन करण्यात येईल.

यावेळी रॅली नंतर भारत मातेचे पूजन करण्यात येऊन वक्त्यांचे भाषण होणार आहे. तरी यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन साम दाम दंड भेद प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयूर सोनार यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com