टोमॅटो बाजारात दाखल; आवक वाढल्याने दरात घसरण

टोमॅटो बाजारात दाखल; आवक वाढल्याने दरात घसरण

कसबे सुकेणे । वार्ताहर | Kasbe Sukene

दिपावलीनंतर (diwali) टोमॅटो (tomato) बाजारभावात (Market Price) मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने शेतकर्‍यांची डोकेदुखी वाढली आहे.

दरम्यान पिंपळगाव (Pimpalgaon) येथे प्रारंभी 500 ते 800 रु. प्रति क्रेटस् ने विक्री होणारे टोमॅटो आज 100 ते 250 रु. प्रति क्रेटस् दराने विक्री होवू लागल्याने या बाजारभावातून टोमॅटो पिकासाठी (tomato crop) झालेला खर्च फिटणे अवघड झाले आहे.

कसबे सुकेणे (Kasbe Sukene) परिसरात अद्यापही शेकडो एकर क्षेत्रावर टोमॅटो पिक उभे असून उशिरा लागवड झालेले टोमॅटो आत्ताच विक्रीसाठी येवू लागले आहे. दिपावलीपूर्वी टोमॅटो सरासरी 500 ते 800 रुपये प्रति क्रेटस् विक्री होत असे. साहजिकच परतीचा पाऊस (rain) दिर्घकाळ लांबल्याने टोमॅटो पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे पुढे टोमॅटोला निश्चित चांगला बाजारभाव मिळेल अशी अपेक्षा शेतकरी बाळगून होते. मात्र दिपावलीनंतर टोमॅटोच्या कोसळत्या बाजारभावाने शेतकर्‍यांचे (farmers) आर्थिक गणित बिघडविले आहे.

उत्पादनात घट झालेली असतांनाच बाजारभावाने निच्चांकी पातळी गाठली असल्याने निसर्गानंतर बाजारभाव देखील पाठ सोडावयास तयार असल्याचे दिसत आहे. टोमॅटो पिकाला चांगला बाजारभाव (market price) मिळेेल या आशेवर शेतकर्‍यांनी महागड्या औषधांबरोबरच खतांचा मोठ्या प्रमाणात वापर केला. साहजिकच टोमॅटो उत्पादन खर्चामध्ये वाढ झाली आहे. त्यातच बांबू, तार, सुतळी, मजुर वर्ग याबरोबरच टोमॅटो खुडणी आणि त्यापुर्वी वेळोवेळी औषध फवारणी या कामांमुळे शेतकर्‍यांचा आर्थिक खर्च वाढून मोठ्या मजुर वर्ग सांभाळावा लागला. मात्र आत्ताचा बाजारभाव बघता टोमॅटो पिकावर झालेला खर्चही वसुल होणे अवघड आहे.

सध्या कर्नाटक (Karnataka) व मध्यप्रदेशाचा (Madhya Pradesh) टोमॅटो बाजारात दाखल झाल्यामुळे आपल्याकडे टोमॅटोचे बाजारभावात घसरण झाल्याचे व्यापारी वर्गांनी म्हटले आहे. यंदाच्या चालू हंगामात सुरुवाती पासूनच टोमॅटोला चांगला भाव टिकून राहिला. मात्र सतत पडणारा पाऊस, अतिवृष्टी (heavy rain), ढगफुटी (cloudburst) टोमॅटो उत्पादनात मोठी घट झाली. या सतत बदलणार्‍या वातावरणामुळे टोमॅटो पिकाला पोषक वातावरण मिळले नाही. त्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होऊन उत्पादनात घट झाली शिवाय परतीच्या पावसामुळे टोमॅटो पिकांचे खूप मोठे नुकसान (crop damage) झाले. टोमॅटो उत्पादक शेतकर्‍यांनी जीवाचे रान करून परतीच्या पावसातही आपले टोमॅटो पिक वाचवले.

मात्र पडलेल्या बाजारभावामुळे पुन्हा एकदा हवालदिल झाल्याचे दिसत आहे. अनेक शेतकर्‍यांनी द्राक्षबागा तोडून त्यात टोमॅटो लागवड केली व टोमॅटो पिकासाठी मोठा खर्च केला. रासायनिक खताचे वाढलेले बाजार व खताची टंचाई यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे. शिवाय रासायनिक खते, औषधे, किटकनाशके यांच्या किंमतीत मागील वर्षाच्या तुलनेत भाव वाढले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले त्यामुळे यापुढे कोणत्या पिकांची लागवडीसाठी निवड करावी असा प्रश्न आता शेतकर्‍यांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने शेतमाल निर्यातीसाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.

बाजारभावाने निराशा केली टोमॅटो पिकाला भविष्यात मोठा बाजारभाव मिळेल या अपेक्षेपोटी उशिरा टोमॅटो लागवड करून टोमॅटो पिकासाठी मोठा खर्च केला. मात्र अचानक बाजारभाव कोसळल्याने मोठे आर्थिक होत आहे. त्यातच टोमॅटोची लागवड करतांना निकृष्ट बियाणांची धास्ती कायम असतांना टोमॅटो लागवड केली. मात्र आत्ताच्या बाजारभावाने निराशा केली आहे.

- विजय बोरस्ते, शेतकरी (कसबे सुकेणे)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com