
चिंचोडी । पोपट मढवई
येवला तालुक्यातील (Yeola Taluka) चिंचोडी रायते (Chinchodi Raite) परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी टोमॅटो पिकाची (Tomato crop) लागवड करत असतात.परंतू यंदा टोमॅटोवर करपा रोगाचा (Karpa disease) प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकर्यांना अडचणींचे ठरत आहे.
टोमॅटोकडे प्रचंड कष्टच आणि खर्चिक पीक म्हणून पाहिले जाते. गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबर या महिन्यात टोमॅटोचे रेट ६० ते ७० रुपये जाळी दराने ह्या मातीमोल भावात (rate) विकल्याने शेतकरी (farmer) प्रचंंड अडचणीत आले होते. केलेला खर्चही निघाला नव्हता. परंतु जानेवारीत क्षेत्र घटल्याने टोमॅटो परत ५०० ते ७०० प्रती कॅरेट विकल्याने आणि हा दर मे महिन्यापर्यत टिकून राहिल्याने शेतकर्यांनी मे-जूनमध्ये मोठ्या प्रमाणात टोमॅटो लागवड केली, परंतु सततच्या पावसामुळे टोमॅटोवर करपा, अळी रोगामुळे उपाययोजनांवर शेतकर्यांचा मोठा खर्च होत आहे. त्यामुळे शेतकरी हताश झाला आहे.
तसेच शेतकर्यांना टोमॅटो रेापे बांधणी करण्यासाठी मजूर (laborer) टंचाईचा सामना करावा लागत आहे. महागड्या औषधाची फवारणी करून शेतकरी आपआपले टोमॅटो क्षेत्र वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. या पिकासाठी एकरी लाख ते दीड लाख रुपये खर्च येत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, गेल्या वर्षी नुकसान झाल्याने यंदा टप्प्या-टप्प्याने लागवड केली आहे, असे चिंचोडी येथील शेतकरी नंदू घोटेकर (Farmer Nandu Ghotekar) यांनी सांगितले.