शेतकर्‍यांच्या तक्रारी आल्यास टोलनाका बंद : आ. बनकर

शेतकर्‍यांच्या तक्रारी आल्यास टोलनाका बंद : आ. बनकर

पालखेड मिरचीचे। वार्ताहर Palkhed Mirchiche / Pimpalgaon Basvant

कधी सेवकांची अरेरावी तर कधी अवाजवी टोल आकारणी यामुळे सतत वादात असलेल्या पिंपळगाव बसवंत टोलनाक्याच्या ( Pimpalgaon Toll plza ) वारंवार विविध प्रकारच्या तक्रारी आ. दिलीप बनकर ( MLA Dilip Bankar )यांना प्राप्त झाल्याने आमदार बनकर यांनी प्रत्यक्ष टोलनाक्यावर जाऊन टोलनाका प्रशासनाला ( Toll Plaza Administration )चांगलेच धारेवर धरले. या आंदोलनादरम्यान एक तास टोल खुला करण्यात आला होता. तसेच यापुढे शेतकर्‍यांच्या तक्रारी आल्यास हा टोलनाका बंद करण्याचा इशारा आ. बनकर यांनी टोल प्रशासनाला दिला.

पिंपळगाव बाजार समिती कार्यक्षेत्रात टोमॅटो हंगामाने वेग घेतला असून निफाडसह जिल्हाभरातील शेतकरी आपली वाहने घेऊन शेतमाल विक्रीसाठी या बाजार समितीत येतात. मात्र जिल्ह्यातील व स्थानिक शेतकर्‍यांची या टोलनाक्यावर अडवणूक केली जाते. तसेच अनेकवेळा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकर्‍यांना बाजार समितीत पोहचण्यास उशीर होतो. हा उशीर होऊ नये म्हणुन शेतकर्‍यांच्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन ठेवण्याच्या सूचना आ. बनकर यांनी संबंधित अधिकारी वर्गाला दिल्या.

तसेच कायमच कर्मचार्‍यांच्या अरेरावीमुळे या टोलनाक्यावर वाद होत असतात, त्यामुळे कर्मचार्‍यांनी टोलवर येणार्‍या नागरिकांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी अशी सूचना दिली. जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या बाहेरील पासिंगच्या वाहनांना लोकल टोल आकारला जात नाही.

संबंधित शेतकर्‍यांचे ओळखपत्र तपासून त्या शेतकर्‍याला टोल माफी देण्यात यावी आदी सूचना देत आ. बनकर यांनी टोलनाका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. सुधारणा न झाल्यास टोलनाका बंद करण्याचा इशारा आ. बनकर यांनी यावेळी दिला. शेतकरी व नागरिकांच्या तक्रारी असल्यास आमदार बनकर कार्यालयाशी तत्काळ संपर्क साधवा. अशा तक्रारी आल्यास संबंधित टोलनाका बंद करण्याचा इशारा आ. बनकर यांनी दिला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com