टोल प्लाझावर स्थानिकांची अडवणूक

टोल प्लाझावर स्थानिकांची अडवणूक
USER

पिंपळगाव बसवंत । प्रतिनिधी

येथील मुबंई-आग्रा महामार्ग (Mumbai-Agra Highway) क्रमांक 3 वरील टोल प्लाझा (Toll Plaza) नेहमी चर्चेत राहिला आहे. सध्या पिंपळगाव शहरातील (Pimpalgaon City) सर्व नागरिकांच्या वाहनांना टोल नाक्यावर (Toll Naka) सुट देण्यात आलेली असताना सध्या शहरातील बहुतेक नागरिकांना टोल नाक्यावर अडवणूक करून टोल वसूल केला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

प्रत्येक नागरिकांना फास्ट टॅगची (Fast tag) विचारना करून त्याच्यात बॅलन्स आहे की नाही याची विचारणा केली जात आहे. साहजिकच शहरातील प्रत्येक नागरिकांना वेठीस धरले जात आहे. शहरातील लोकल वाहनांना या टोल नाक्यावर कमीत कमी 15 ते 20 मिनिटे अडवले जाते. तेथील कर्मचारी वर्गाची वागणूक सध्या चांगली नाही. कायम अरेरावीची भाषा वापरली जाते. त्या कारणामुळे त्याचा परिणाम रहदारीवर होतो. सध्या टोमॅटो हंगाम (Tomato season) चालू असल्यामुळे येथील टोल नाक्यावर प्रशासनाचे शून्य नियोजन असल्यामुळे रहदारी होते.

त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. टोल प्रशासनाने याची दखल घेऊन त्वरित सुधारणा करावी. अन्यथा पिंपळगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (Nationalist Youth Congress) वतीने व निफाड तालुक्याचे (Niphad Taluka) आमदार दिलीप बनकर (MLA Dilip Bankar) यांच्या नेतृत्वाखाली या टोलनाक्याविरुद्ध लवकरच तीव्र आंदोलन (Movement) छेडले जाईल असा इशारा पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Basvant) राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष उमेश तथा बाळा बनकर यांनी दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com