नाशिक l Nashik (प्रतिनिधी) :

टोल नाका संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. १ जानेवारी २०२१ पासून सर्व चारचाकी वाहनांसाठी फास्टटॅग्स बंधनकारक करण्यात आले. मात्र अनेक वाहनधारकांनी या सुविधेची अमलबजावणी न केल्यामुळे फास्टटॅग्स साठी १५ फेब्रुवारी पर्यंत मुदत वाढ देण्यात आली.

फास्टटॅग्स न बसविण्यास दुप्पट टोल भरावा लागणार या काळजीपोटी नाशिक परिसरातील वाहन चालकांनी वाहनांवर फास्टटॅग्स स्टिकर बसविणे सुरू केले आहे. तसेेच ही सेेेेवा ऑनलाईन असल्यामुळे यासाठी बँकांनी सेवा देणे सुरू सुरू केले आहे.

स्मार्ट आणि स्वस्त प्रवास करता यावा यासाठी कोटक महिंद्रा बँकेने कोटक एनईटीसी फास्टटॅग्स या सवलतीची घोषणा केली असून या योजनेद्वारे वाहनधारकांनी टोल भरल्यास टोल शुल्क परतावा मिळणार आहे. सर्व प्रवासी गाड्यांसाठीच्या या योजनेत टोल शुल्क भरल्यास पाचशे रुपये पेक्षा अधिक शुल्क परतावा मिळणार आहे.

तसेच इशुअन्स व्हेवरची सुविधा मिळणार आहे एका महिन्याचा टोल व्यवहारांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पुढील 30 दिवसांच्या आत ग्राहकांच्या फास्टटॅग वॉलेटमध्ये शुल्क परताव्याची रक्कम जमा केली जाईल असे कोटक बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले. संपूर्ण देशातील टोल नाक्यांवर डिजिटल पेमेंट सिस्टिमला चालना देण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार एम आणि एन प्रकारातील वाहनांनाही आता फास्टटॅग्स चा स्टीकर लावावा लागणार आहे. यासह जुन्या वाहनांनाही आता फास्टटॅग्स लावणे अनिवार्य होणार आहे. याच पार्श्वभूमीवर ही ऑनलाईन सुविधाअधिक सोपी व्हावी यासाठी बँका ही सरसावल्या आहेत.