
कसबे सुकेणे | Sukena
निसाका कामगार वसाहतीत सोनेवाडी येथील पी.पी.एफ ग्रेप ग्रोवर फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या वतीने...
सामाजिक उत्तरदायित्व निधीतून करण्यात आलेल्या स्वच्छता गृहाचे उद्घाटन कंपनीचे प्रवर्तक अमित पडोळ यांच्या हस्ते करण्यात आले.
पी.पी.एफ. ग्रेप ग्रोवर कंपनीच्या वतीने निसाका येथे बांंधण्यात आलेल्या स्वच्छता गृह उद्घाटनप्रसंगी पिंपळस ग्रामपालिका सरपंच तानाजी पूरकर, निसाका प्रभारी कार्यकारी संचालक भागवत भंडारे उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षांपासून कारखाना बंद असल्याने संपूर्ण परिसरात अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्यांची दखल ग्रा.पं. सदस्य विष्णुपंत मत्सागर व मकरंद कुलकर्णी यांनी घेऊन त्यांनी कंपनीच्या पदाधिकार्यांना याबाबत माहिती दिल्याने कंपनीने सदर सुविधा उपलब्ध करुन दिली. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी कंपनीचे आभार मानले.
यावेळी कंपनीचे प्रवर्तक अमित पडोळ म्हणाले की, कंपनीच्या होणार्या उत्पन्नातून समाजातील दुर्बल वंचित घटकांच्या समस्या सोडविण्यासाठी कंपनीच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत.
याप्रसंगी कंपनीचे अध्यक्ष संजय माळोदे यांच्यासह विविध पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.