कोटींचा जॉगिंग ट्रॅक पाण्याखाली; क्रिडापटू निराश

कोटींचा जॉगिंग ट्रॅक पाण्याखाली; क्रिडापटू निराश

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

दोन महिन्यापुर्वीच लोकार्पण झालेल्या येथील कॉलेज मैदानावरील बहुचर्चित जॉगिंग ट्रॅक (Jogging track) पावसाच्या (rain) पहिल्या तडाख्यातच जलमय बनला. तब्बल एक ते दिड तास सुरू असलेला धुवाँधार पावसाने (heavy rain) जॉगिंग ट्रॅकवरील माती-वाळू वाहून जाण्याबरोबर पेव्हर ब्लॉक (Paver block) देखील उखडले गेले.

कॉलेज मैदानावर साचणार्‍या पावसाचे पाण्याचा निचरा होण्याची ठोस उपाययोजना न करताच जॉगिंग ट्रॅक बांधला गेल्याने पावसाने या ट्रॅकची वाताहत केली. संबंधित विभागाच्या या कार्यपध्दतीवर क्रिडाप्रेमींतर्फे तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे. मार्केट बाजुकडील संपुर्ण ट्रॅकच पाण्याखाली गेल्याने पाणी उपसण्यासाठी सेक्शन पंप (Section pump) लावण्यात आला मात्र पाण्याचा वेग अधिक असल्याने हे प्रयत्न तोकडे पडू लागल्याने पंप बंद केला गेला.

जॉगिंग ट्रॅक (Jogging track) पाण्याखाली गेल्याने आगामी तीन ते चार महिने हा ट्रॅक व्यायामपटूंसाठी बंदच ठेवावा लागणार असल्याचे चित्र दिसून आले आहे. येथील कॉलेज मैदानावर क्रिडापटूंच्या सुविधेसाठी कृषिमंत्री दादाजी भुसे (Agriculture Minister Dadaji Bhuse) यांच्या प्रयत्नामुळे नगरविकास विभागाने (Urban Development Department) दिलेल्या 1 कोटी 30 लाखाच्या निधीतून (fund) जॉगिंग ट्रॅकची निर्मिती करण्यात आली आहे.

सुमारे एक कि.मी. अंतराचा हा ट्रॅक जॉगिंग करणार्‍या नागरीकांसाठी पर्वणी ठरला आहे. ट्रॅकची निर्मिती करतांना पावसाळ्यात कॉलेज मैदानावर साचणार्‍या पाण्याचा योग्य निचरा होण्याच्या दृष्टीकोनातून पुरेशी आवश्यक उपाययोजना केली न गेल्याचे पहिल्याच पावसाच्या पाण्यात ट्रॅक जलमय झाल्याने दिसून आल्याने जॉगिंग करणार्‍या नागरीकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. सुमारे सव्वाकोटीच्या निधीतून या ट्रॅकची उभारणी करण्यात आली. मात्र पाण्याचा निचरा होणार नसल्याने पावसाळ्यात हा ट्रॅक पाण्याखालीच राहण्याची शक्यता दिसून येत आहे.

कॉलेज मैदान पावसाच्या पाण्यात तुडूंब भरल्याने मनपातर्फे सेक्शन पंप (Section pump) लावण्यात येवून ट्रॅकवरील पाणी उपसण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने पंपाव्दारे पाणी उपसण्याचे प्रयत्न तोकडे पडल्याचे दिसून आले.

मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे (Rainfall) माती-वाळू वाहून जाण्याबरोबर पेव्हर ब्लॉक देखील ठिकठिकाणी उखडले गेल्याने जॉगिंग ट्रॅकची मोठ्या प्रमाणात वाताहत झाली असल्याचे चित्र दिसून आले. कॉलेज मैदानावरील पाणी पुर्वेकडे साचले जाते. या पाण्याचा निचरा होण्यासाठी कॉलेज मैदान ते मोसम नदीपर्यंत भुमीगत गटार बांधण्याची आवश्यकता आहे. मात्र या मागणीकडे लोकप्रतिनिधी व प्रशासन यंत्रणा गांभीर्याने लक्ष देत नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com