तोफखाना केंद्रीय विद्यालयाच्या ओम पगारला 'इन्स्पायर अवॉर्ड'

तोफखाना केंद्रीय विद्यालयाच्या ओम पगारला 'इन्स्पायर अवॉर्ड'

नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad

तोफखाना केंद्रीय विद्यालयाचा आठवीचा विद्यार्थी ओम पगार याची इन्स्पायर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. (Inspired award to tofkhana kendriya vidyalaya Student om pagar) भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने इन्स्पायर पुरस्कार योजनेतील निवडलेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली आहे....

अधिक माहिती देताना शाळेचे प्राचार्य देवेंद्र कुमार ओलावत (Principle devendra kumar olavat) म्हणाले की, केंद्र सरकारच्या या इंस्पायर अवॉर्ड योजनेंतर्गत इयत्ता 6 वी ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या प्रतिभावान विद्यार्थ्यांना संधी मिळते.

या योजनेत देशभरातून एक लाख विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 10 हजार रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाते. निवडलेल्या मुलांना या योजनेद्वारे परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते. देशातील केंद्रीय विद्यालयांमधून एकूण ६६४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

या योजनेसाठी तोफखाना केंद्रीय विद्यालयाचा विद्यार्थी ओम पगार याने "रूफटॉप मल्टी लेयर फार्मिंग" (Rooftop multi layer farming) हा प्रकल्प सादर केला. या यशाबद्दल उपप्राचार्या अंजू कृष्णानी, विज्ञान शिक्षिका उज्ज्वला चांदोरकर आणि सर्व शिक्षकांनी ओमचे कौतुक व अभिनंदन केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com