जिल्ह्यात आज ‘इतके’ करोनाबाधित

जिल्ह्यात आज ‘इतके’ करोनाबाधित

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यात दिवसभरात 97 जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह (corona positive) आले आहेत. तर मागील चोवीस तासात 68 रूग्णांनी करोनावर मात केली....

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासात 97 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील (Nashik City) संख्या 43 इतकी आहे.

आज ग्रामिण भागात (Nashik Rural) 53 रुग्ण तर, जिल्हाबाह्य 1 रुग्णाची नोंद झाली आहे. मालेगाव कार्यक्षेत्रात एकही रुग्ण आढळला नाही.

प्रशासनाने बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांच्या ट्रेसिंगचे आदेश दिले आहेत. आरोग्य प्रशासनातर्फे घाबरून न जाण्याचे आवाहन करण्यात आले असून नागरिकांनी शासकीय नियमावलीचे पालन करावे.

जिल्ह्यात आज 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही रुग्ण ग्रामीण विभागातील आहेत. यामुळे जिल्ह्यात मृत्यूचा आकडा 8 हजार 568 इतका झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com