पुण्याच्या धर्तीवर आजची महासभा घ्यावी

शिवसेनेची महापौर कुलकर्णींकडे मागणी
पुण्याच्या धर्तीवर आजची महासभा घ्यावी

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

नाशिक महानगरपालिकेची व्हिडीओ कॉन्फरसिंंगद्वारे आज (दि.19) महासभा होत असुन पुणे महापालिकेच्या धर्तीवर सभागृहात सामाजिक अंतराचे नियम पाळून ही महासभा घेण्यात यावीत अशी मागणी शिवसेना विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी महापौर सतिश नाना कुलकर्णी यांच्याकडे केली आहे. दरम्यान आजच्या महासभेस काही वादग्रस्त विषय असल्याने ही महासभा गाजण्याची शक्यता आहे.

पुणे महापालिकेकडुन काही दिवसापुर्वी सोशल डिस्टसिंगचे पालन करुन थेट सभागृहात मोठा पडदा लावून महासभा घेण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेची महासभा घेण्यात यावीत अशा आशयाचे पत्र आजच विरोधी पक्षनेते बोरस्ते यांनी महापौरांना दिले आहे. यात व्हिडीओ कॉन्फरसिंंगद्वारे घेण्यात आलेल्या महासभांना विरोधी पक्ष म्हणुन सहकार्य केले आहे.

या महासभेत अनेक प्रकारचा व्यत्यय येत असुन नेटवर्क जाणे, सदस्यांचे म्हणणे पिठासन अधिकार्‍यांना ऐकु न जाणे याप्रकारामुळे महासभेचे गांभीर्य नष्ट होत आहे. यामुळे सोशल डिस्टसींगचे सर्व नियम पाळून ही महासभा सभागृहात घेण्यात यावीत. चालु वर्ष हे सदस्यांसाठीचे अखेरचे वर्ष असल्याने त्यांच्या समस्या, प्रस्ताव सभागृहात मांडले गेल्यास त्यांची चांगल्या प्रकारे सोडवणुक होऊ शकते.

सभागृहात सोशल डिस्टसींग राखण्याच्या दृष्टीने मर्यादीत सभासदांची संख्या होण्याच्या दृष्टीने सर्वपक्षीय गटनेते, सभागृह नेेते, विरोधी पक्षनेते व इतर पदाधिकारी यांना सभागृहात प्रवेश देऊन ऐनवेळी विषयासंबंधीत ज्या सदस्यांना मत मांडायचे आहे, त्यांनाच सभागृहात क्रमाने प्रवेश द्यावा जेणेकरुन सदस्यांना आपले मत योग्यरितीने मांडता येईल, असेही बोरस्ते यांनी म्हटले आहे.

आजच्या महासभेत कश्यपी धरणग्रस्त 36 प्रकल्पग्रस्तांना महापालिकेत नोकरीत सामावून घ्यावेत अशा मागणीचा प्रशासनाचा प्रस्तावावर चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार आहे. या प्रस्तावावर मागील महासभेत कायदेशिर सल्ला येईपर्यत हा तहकुब ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावर कायदेशिर सल्ला आल्यानंतर या प्रकल्पग्रस्तांना मनपात नोकरीत सामावून घेण्याचा प्रस्ताव पुन्हा आजच्या महासभेत आला आहे. आज या प्रकल्पग्रस्तांनी दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापौर कुलकर्णी यांची भेट घेत प्रस्ताव मंजुरीची मागणी केली.

आज शिक्षण समिती 9 सदस्यांची निवड

नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या शिक्षण समितीची मुदत संपुष्टात आली असुन या समितीवर नव्याने नऊ सदस्य निवडीची प्रक्रिया आजच्या महासभेत पुर्ण केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज महापौरांनी सर्वपक्षीय गटनेत्यासोबत चर्चा करीत संख्या बळानुसार सदस्यांची नावे देण्याची सुचना केली. यानुसार भाजप 5, शिवसेना 2, कॉग्रेस व राष्ट्रवादी प्रत्येक 1 अशा सदस्यांची समितीवर नियुक्ती केली जाणार आहे. यानुसार गटनेत्यांकडुन सदस्य निवडीसाठी आलेल्या नावाची घोषणा आज महापौर महासभेत करणार आहे.

कोविडच्या कर्मचार्‍यांची सवेत घ्यावेत

नाशिक मनपाच्या कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर व कोविड रुग्णालयात मानधनावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांची सेवा खंडीत न करता, त्यांच्या मानधनात वाढ करावी अशी मागणी नगरसेवक संतोष साळवे यांनी केली असुन यासंदर्भातील विषय आजच्या महासभेत दिला आहे. या मानधनावरील कर्मचार्‍यांना मनपाच्या वैद्यकिय विभागातील रिक्त जागेवर सेवेत कायम करण्याचा प्रशासनाने सहानुभूतीपुर्वक विचारा करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

साहित्य संमेलनासाठी 50 लाखाची मदत द्या

चौदावे अखिल भारतील मराठी साहित्या संमेलनाचा मान नाशिक शहराला मिळाला आहे. याचे नियोजन शहरातील लोकहितवादी मंडळांकडुन केले जात आहे. या संमेलनाच्या निमित्ताने देशभरातून येणार्‍या सारस्वतांचा सन्मान करण्याचा योग नाशिक महानगरला मिळाला आहे. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी लोकहितवादी मंडळाकडु न 50 लाख रुपयांची मदत करण्याची विनंती करण्यात आली असुन त्यास मान्यता देण्यात यावीत असा प्रस्ताव आजच्या महासभेवर उपमहापौर श्रीमती भिकुबाई बागुल यांनी दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com