नाशकात दिवसभरात 106 पॉझिटिव्ह; 7 मृत्यू

नाशकात दिवसभरात 106 पॉझिटिव्ह; 7 मृत्यू

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 106 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. तर 114 जण करोनामुक्त झाले आहेत. यामुळे आतापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्यांचा आकडा 3 लाख 82 हजार 182 वर पोहचला आहे. हे प्रमाण 97.34 टक्केंवर पोहल्याने सर्वांना दिलासा मिळत आहे...

जिल्हाभरातील जानेवारीपासूनच्या नोंदी राहिलेल्या मृत्युच्या नोंदी सुरू असून आज 72 जुने मृत्यू नोंदण्यात आले तर आज दिवसभरात 7 मृत्यु झाले आहेत. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात 8 हजार 38 मृत्युची नोंद झाली आहे.

नाशिक शहरात करोना आटोक्यात येत असून ग्रामिण भागातही ही घट दिसत आहे. जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासात 106 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील संख्या 54 इतकी कमी आहे.

ग्रामिण भागातही रूग्ण संख्या घटत असून आज ग्रामिण भागात 44 तर मालेगाव 3 व 5 जिल्हाबाह्य रूग्ण आढळले. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोना रूग्णांचा आकडा 3 लाख 92 हजार 630 इतका झाला आहे.

दरम्यान जिल्ह्यात आज दिवसभरात उपचार घेणार्‍या रूग्णांमध्ये मोठी घट आली असून हा आकडा आता 2 हजार 410 इतका कमी झाला आहे. यामध्ये नाशिक शहरातील 1 हजार 179 तर ग्रामिण भागातील 1 हजार 113 रूग्णांचा सामावेश आहे. नव्याने दाखल होणार्‍या रूग्णांचा आकडाही घटला असून आज दिवसभरात 637 रूग्ण दाखल झाले आहेत. यात सर्वाधिक 577 नाशिक शहरातील आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com