जिल्ह्यात दिवसभरात १५८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

मागील चोवीस तासात १६३ रुग्णांची करोनावर मात
जिल्ह्यात दिवसभरात १५८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
करोना

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यात शहर तसेच ग्रामिण भागात करोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. दिवसभरात १५८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर मागील चोवीस तासात १६३ रूग्णांनी करोनावर मात केली.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील २४ तासात १५८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील संख्या १२२ इतकी आहे. ग्रामिण भागातही रूग्ण संख्या घट असून आज ग्रामिण भागातील ३९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मालेगावात १ रूग्ण आढळला. तर जिल्हाबाह्य ६ रुग्णांची नोंद झाली आहे .

आज जिल्ह्यात ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात ग्रामिण भागातील ३ रूग्ण आहेत, तर नाशिक शहरातील १ रूग्णांचा सामावेश आहे.यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा ७ हजार २३५ इतका झाला आहे.

आज रोजी पोर्टल वर अपडेट झालेले एकूण मृत्यु -१०३

(नाशिक मनपा-८०,मालेगाव मनपा- ०१, नाशिक ग्रामीण-२२, जिल्हा बाह्य- ००)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com