आज रक्षाबंधन; करोना आणि पावसाचे सावट

आज रक्षाबंधन; करोना आणि पावसाचे सावट
Rakshabandhan

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आज नारळी पौर्णिमा. अर्थातच रक्षाबंधन (Rakshabandhan) भावा-बहिणीच्या नात्याचा अनोखा सण. मात्र, या सणावर करोना (Corona) विषाणूचे आणि पावसाचे (Rain) सावट आहेच. बाजारात देखील या सणाच्या उत्सवावर पावसामुळे पाणी फेरले...

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बाजारपेठेत रक्षाबंधन असल्याने नागरिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. मात्र, दुपारी अचानक आलेल्या नागरिकांची पावसाने त्रेधातिरपीट उडाली.

त्यातच स्मार्ट सिटीच्या (Smart City) कामांमुळे सुरू असलेले रस्त्यांचे खोदकाम यामुळे देखील वाहतूक कोंडी (Traffic jam) होताना दिसत होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी करोनाचे बंधन शिथिल असल्याने नागरिकांना मोकळीक मिळाली आहे.

तरीदेखील करोना विषाणूचा धोका पूर्णपणे टळलेला नसल्याने काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com