पुन्हा एकदा सोनसाखळी चोरीच्या घटनांनी नाशिक हादरले

एकाच दिवशी तीन ठिकाणी सोनसाखळी चोरी
पुन्हा एकदा सोनसाखळी चोरीच्या घटनांनी नाशिक हादरले
USER

नाशिक | प्रतिनिधी Nashik

घटस्थापनेच्या दिवशीच नाशिक शहरातील तीन विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये सायंकाळच्या वेळी सोनसाखळी Chain Snatching चोरीच्या घटना घडल्या. यामुळे नाकेबंदी करण्यात आली आहे.

नाशिक शहरातील उपनगर पोलिस ठाण्याच्या Upnagar Police Station हद्दीत सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पहिली सोनसाखळी चोरीची घटना घडली.

त्यानंतर अंबड पोलीस ठाण्याच्या Ambad Police Station हद्दीत उमा हॉस्पिटल च्या मागील बाजूस अभियंता नगर येथे 07:40 वाजेच्या दरम्यान दुसरी सोनसाखळी चोरीची घटना घडली .

रात्री ०८:१५ ते ०८:३० वाजेच्या दरम्यान सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या Sarkarwad Police Station हद्दीत राका कॉलनी येथे तिसरी सोनसाखळी चोरीची घटना घडली.

यामुळे चोरट्यांनी पोलीस यंत्रणेला एक आव्हानच दिले आहे. संपूर्ण नाशिक शहरामध्ये सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नाकेबंदी करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस सूत्रांकडून समजते.

सदर तीनही घटना ह्या एका गुन्हेकाराने केल्या कि, यामध्ये वेगवेगळ्या गुन्हेगारांचा समावेश आहे याचा तपास आता पोलिस घेत आहेत. ज्या ज्या ठिकाणी सोनसाखळी चोरी झाली त्या त्या ठिकाणच्या जवळपास असलेले सीसीटीव्ही तपासणीचे काम पोलिसांकडून सध्या सुरू आहे.

Related Stories

No stories found.