मनपा आयुक्त जाधव साधणार संवाद

मनपा आयुक्त जाधव साधणार संवाद

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महापालिका क्षेत्रात करोना संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असुन याकरिता मनपा यंत्रणा पुन्हा एकदा कामाला लागली आहे. यात करोना प्रादुर्भाव रोकण्यासाठी नाशिककरांचा सहभाग महत्वाचा असुन याच पार्श्वभूमीवर आज (दि.20) दुपारी 12.30 वाजता मनपा आयुक्त कैलास जाधव हे फेसबुकच्या माध्यमातून नाशिककरांशी संवाद साधणार आहे.

आयुक्त आज नाशिक शहरातील कोविड सद्यस्थिती विषयी नाशिककरांशी संवाद साधणार आहे. शहरातील कोविड सद्यस्थिती विषयी माहिती व नाशिककरांच्या शंकाचे निरसन आयुक्त करणार आहे.

नाशिककर आपल्या नाशिक शहरातील करोनाबाबत मनपाच्या वतीने केल्या जात असणार्‍या विविध उपाययोजना, प्रत्येकांनी घ्यावयाची खबरदारी याविषयी संवाद साधणार आहे. यात जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com