
नाशिक | प्रतिनिधी
पांजरापोळ मध्ये ठेवण्यात आलेले उंटांचे आज आईव्हर मॅकटीन आणि टॅगिंगचे काम अखेर पूर्ण झाले आहे. बुधवारी रायका नाशिकला आल्यांनंतर ते उंट राजस्थाानला रवाना होणार आहे.
पांजरापोळ चुंचाळे फार्म या ठिकाणी ५ आणि ६ मे रोजी तब्बल १११ उंट ताब्यात घेऊन त्यांना सुरक्षित येथे ठेवण्यात आले होते, त्यापैकी १८ ते २० उंट अत्यंत अत्यावस्थेत होते.
त्यांच्यावर पशुवैद्यकीय अधीकार्यांनी उपचार केले आहेत. यां उंटांपैकी आज पर्यंत सहा उंट अतिशय असहाय्य असल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे आणि उरलेले १०५ उंटांना आज आईव्हर मॅकटीन आणि टॅगिंगचे काम झाले आहे.
सकाळी ७ पासून दुपारी २ वाजे पर्यंत पशुवैद्य आणि त्यांची टिम तसेच मंगलरूप गो-शाळेची टिम आणि पांजरापोळ येथील कर्मचाऱ्यांनी हे काम आज पूर्ण केले. महसलुमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही बैठकीत उंटाची स्थीती जाणून घेतली.
यावेळी पशसंर्वधन उपुक्त डॉ. गिरीश पाटील यांनी सांगीतले की उंटांना घेऊन जाणारे रायका रविवार पर्यंत नाशिकला येणार होते. मात्र त्यांना नाशिकहुन पायी परत जाण्यासाठी एक महीना कलावधी लागणार असल्याने ते सर्व किराणा साहीत्य घेऊन बुधवार पर्यंत येणार आहेत. त्यानंतर ते राजस्थानला रवाना होतील. त्यामुळे अजुन तिन दिवस या उंटाचा पाहुणचार करावा लागणार आहे.