ई-पीक पाहणीसाठी आज अंतिम मुदत

ई-पीक पाहणीसाठी आज अंतिम मुदत

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

राज्यात 15 ऑगस्टपासून शेतकर्‍यांनी पीक पेरणीची माहिती स्वतः ऑनलाईन करण्यासाठी इ-पीक पाहणी E-Peek Pahani प्रकल्प सुरू आहे. प्रकल्पाचे 100 टक्के कामकाज पूर्ण होण्यासाठी शेतकर्‍यांनी 14 ऑक्टोबरपर्यंत आपली इ-पीक पाहणी पूर्ण करण्याचे आवाहन तहसीलदार राहुल कोताडे यांनी केले आहे.

क्षेत्रीय स्तरावरून वास्तविक वेळेत पिकांची माहिती संकलित करणे तसेच सदर माहिती संकलित करताना पारदर्शकता आणणे, पीक पाहणी प्रक्रियेत शेतकर्‍यांचा सहभाग वाढवणे, शेतकर्‍यांच्या हितासाठी असलेल्या सरकारी योजनांच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी सदर माहिती वापरणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.

त्यामुळे शेतकर्‍यांनी त्वरित आपली इ-पीक पाहणीची नोंदणी करून घ्यावी व काही अडचणी आल्यास गावातील तलाठ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कोताडे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.