आज 'नाट्यरसिक आयडॉल'ची अंतिमफेरी

आज 'नाट्यरसिक आयडॉल'ची अंतिमफेरी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाट्यकलावंतांच्या नाट्यरसिक समुहाने 'नाट्यरसिक आयडॉल 'Natyarasik Idol' स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी कल्पेश कुलकर्णी, प्रांजल सोनवणे व भारत मधाळे या तीन स्पर्धकांमध्ये रविवार, दि.१० ऑक्टोबर रोजी दुपारी ४ ते ६ या वेळात बेकर्स क्राफ्ट, दुर्गानगर, त्रिमुर्ती चौक येथे होणार असल्याची माहिती समुहाचे श्रीराम वाघमारे यांनी दिली.

अंतिम फेरीत स्पर्धकांना काव्यअभिवाचन, गीत गायन, मनोगत सादरीकरण अशा ३ फेऱ्यांमधुन जावे लागणार आहे. अंतिम फेरीसाठी अभिनेता, दिग्दर्शक सचिन शिंदे परिक्षक म्हणून लाभणार आहेत.

या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी 'आपली आवड' ही फेरी घेण्यात आली. त्या फेरीत ३० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. प्राथमिक फेरीमधुन १२ स्पर्धकांची निवड करण्यात आली. पुढे १२ मधुन अंतिम फेरी साठी ३ स्पर्धकांची निवड करण्यात आली.

या स्पर्धेतील विविध फेऱ्यांना विवेक गरूड, माधुरी माटे, मिलिंद सफई, सुहास भोसले, क्षमा देशपांडे इत्यादींनी अतिथी परिक्षक म्हणून तर शुभांगी पाठक, विजय पवार यांनी नियमित परिक्षक म्हणून कामकाज पाहिले. तर पुनम पाटील, पल्लवी पटवर्धन, मुकेश काळे, जयदीप पवार यांनी या स्पर्धकांना मार्गदर्शन केले. तर या प्रसंगी सुत्रसंचालन पुजा सोनार करणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com