नाशिक । प्रतिनिधी

सर्व शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील (आयटीआय) प्रवेशासाठी केलेल्या अर्जात दुरुस्ती आणि दहावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यासाठी प्रवेश अर्ज सादर करण्याची संधी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आता दहावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि आयटीआय प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना आज सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.

राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागिर प्रशिक्षण योजनेअंतर्गत ऑगस्ट 2020 सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया पद्धतीने करण्यात येत असून प्रवेशाची सविस्तर माहितीhttp://admission.dvet.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील सर्व प्रकारच्या जागांसाठी प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने होतात.

केंद्रीय पद्धतीत उपलब्ध जागा आणि संस्थास्तरावरील जागांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक राहणार आहे. कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन प्रवेश प्रणालीव्यतिरिक्त प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांचे प्रवेश ग्राह्य धरण्यात येणार नाहीत, याची नोंद विद्यार्थी, पालक आणि आयटीआय संस्थांनी घ्यावी, अशी सूचना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने केली आहे.

प्रवेशप्रक्रियेचा तपशील

ऑनलाईन अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे, प्रवेश अर्ज पूर्ण भरल्यानंतर प्रवेश अर्ज शुल्क जमा करणे : 11 जानेवारीपर्यंत (सायंकाळी पाच वाजेपर्यंत)

गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे : 12 जानेवारी (सायंकाळी पाच वाजता)

खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील संस्थास्तरावरील प्रवेश निश्चित करणे : 16 जानेवारीपर्यंत.