आज ईद उल अजहा
नाशिक

आज ईद उल अजहा

सामुदायिक नमाज सोहळा नाही

Farooque Pathan

Farooque Pathan

जुने नाशिक |प्रतिनिधी Nashik

इस्लाम धर्माचे ज्येष्ठ धर्मगुरू हजरत इब्राहिम अलैहसलाम व हजरत इस्माईल अलैहसलाम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व अल्लाहच्या मार्गात त्याग व कुर्बानीची शिकवण देणारा पवित्र 'ईद उल अजहा' अर्थात बकरी ईदचा सण आज मुस्लिम समाज साजरा करणार आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ईदची विशेष सामुदायिक नमाज शाहजानी ईदगाह मैदानावर होणार नसून मुस्लिम समाज घरीच नमाज पठण करून कुर्बानी देऊन सण साजरा करणार आहे.

 रमजान ईद प्रमाणे बकरी ईदचा मोठा सण देखील मुस्लिम बांधवांना घरीच साजरा करावा लागत आहे. दरम्यान कुर्बानीसाठी लागणाऱ्या जनावरे खरेदीसाठी रात्री उशिरापर्यंत मुस्लीमबहुल भागात रेलचेल दिसत होती. करोना संकटामुळे मोठे बाजार जरी भरत नसले तरी ऑनलाईन किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून बकऱ्यांची खरेदी-विक्री होत आहे. करोनाची पार्श्वभूमीवर मशीद व पवित्र ईदगाह मैदानावर नमाज पठण होणार नाही.

असेही मिळू शकते पुण्य

आर्थिक सक्षम लोकांवरच कुर्बानी वाजीब आहेत, जे सक्षम आहेत त्यांनी इस्लाम धर्माने दिलेल्या आदेशाप्रमाणे जनावरांची कुर्बानी करावी व जे सक्षम नाहीत त्यांनी बकरी ईदच्या दिवशी आपल्या बोटांवरील व पायाच्या बोटावरील नख व्यवस्थित कापावे, पुरुषांनी आपल्या मिश्या व इस्लाम धर्माने कापण्याचे आदेश दिलेले अंगावरील इतर केस व्यवस्थित काढावे, यामुळेदेखील कुर्बानी दिल्या सारखे पुण्य प्राप्त होतो, अशी माहिती मौलाना सय्यद नदीम नुरी यांनी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com