येवला उपजिल्हा रूग्णालयात आज आठ करोना रुग्णांचा मृत्यू

येवला उपजिल्हा रूग्णालयात आज आठ करोना रुग्णांचा मृत्यू
USER

येवला । प्रतिनिधी

येथील उपजिल्हा रुग्णालयात आज एक दिवसात तब्बल आठ जणांचा करोना मुळे मृत्यू झाला. येथे रोजच पाच ते सात जण करोनामुळे दगावत असल्याने येवलेकर यांचे धाबे दणाणले आहे.आज देखील येथे आठ जणांचा बळी गेला आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने या गंभीर प्रश्नी लक्ष घालून उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

येथे मृतांच्या आकड्याची शंभरी पार झाली आहे. २८ मार्चला ६० वर असलेला आकडा आता शंभरावर गेल्याने अधिकच चिंतेत वाढ होत आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात आजही ८ मृत झाले असून रोजच मृत होत असल्याने बळींची संख्या वेगाने वाढत आहे.

खाजगी हॉस्पिटलमध्येही रुग्णांवर उपचार सुरू असून त्यामुळे अनेकांना आधार मिळाला आहे. तथापि अचानक तब्येत खालवून ज्येष्ठ व इतर आजारांचा संदर्भ असलेले रुग्ण मृत होत असल्याने डॉक्टरांसह सर्वच हतबल होताना दिसतायत. एप्रिल महिना सुरू झाल्यापासून एकही दिवस रुग्ण दगावला नाही असे झाले नसून शहरातील रुग्णसंख्या व मृत्यूचे प्रमाण अल्प असले तरी ग्रामीण भागातून मात्र रुग्ण व मृत वाढले आहेत.

३० मार्च पर्यंत येवल्यात ५९ रुग्ण दगावलेले होते. त्यानंतर एक एप्रिल पर्यंत ६६ झाल्यावर येथे मृतांचा आकडा वेगाने वाढला असून सात तारखेला ८२, नऊला ८९, दहाला ९२, अकराला ९३, तेराला १०१ तर आज १०४ वर हा आकडा पोहोचला आहे. रोजच मृत्यूच्या बातम्या येत असल्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईकांसह सर्वसामान्य नागरिकही हादरलेरले आहेत. हे फक्त उपजिल्हा रुग्णालयातील तालुक्यातील आकडे आहेत. याव्यतिरिक्त खाजगी दवाखाने तसेच इतर तालुक्यातून येथे उपचार घेणाऱ्यासाठी झालेले मृत वेगळेच असून हा आकडा दीडशेच्या पुढे असण्याची शक्यता आहे.

आज येथील मृतांचा आकडा आठवर गेला आहे.आज दिवसभरात मनमाड, धूळगाव, लासलगाव, भिंगारे, सटाणा, अंदरसुल, येवला व एरंडगाव येथील रुग्णांचा मृत्यू झाला असून येवल्यासारख्या ठिकाणी एवढे मृत्यू होत असल्याने आश्चर्य व चिंताही व्यक्त होत आहे. दरम्यान मंगळवारी येथे १०६ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता तर आज ५५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यामुळे येथील रुग्ण संख्या दोन हजार ७७४ वर पोचली असून सद्यस्थितीत ४६८ जण उपचार घेत आहेत.

"रुग्ण उशिराने येथे दाखल होत असल्याने मृतांचा आकडा वाढला आहे.अनेक जण लक्षणे दिसू लागली की दोन ते तीन दिवस घरी किंवा स्थानिक डॉक्‍टरांकडे उपचार घेतात.त्यानंतर ऑक्सिजन ८० च्या आसपास आल्यावर आमच्याकडे दाखल होतात.त्यामुळे मृत्यूंची संख्या वाढली आहेत."

-शैलजा स्वामी, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, येवला

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com