जिल्ह्यात एका दिवसात ३१ करोनाबळी

नाशिक शहरातील २२ तर ग्रामिण भागातील ९ रूग्णांचा समावेश
जिल्ह्यात एका दिवसात ३१ करोनाबळी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहर तसेच जिल्हात करोनाचा उद्रेक सुरूच असून दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत आहे. याबरोबरच आज एकाच दिवसात विक्रमी ३१ जणांचे बळी करोनाने घेतले आहेत. यात नाशिक शहरातील २२ तर ग्रामिण भागातील ९ जणांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात करोनाबळींचा आकडा ५७८ वर पोहचला आहे. मागील २४ तासात जिल्ह्यात ७३७ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्ताचा आकडा १८ हजार ४४४ इतका झाला आहे.

आज रात्रीपर्यंत जिल्हा प्रशासनास प्राप्त अहावालानुसार आज दिवसभरात एकुण ७३७ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील ४६५ रूग्ण आहेत. यात शहरातील नवीन नाशिक, नाशिकरोड, पंचवटी, सातपुर गाव, उपनगर, नाशिकरोड, इंदिरानगर, पेठरोड, जुने नाशिक, वडाळारोड येथील रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे नाशिक शहराचा आकडा १२ हजार ५०४ वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील २३४ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा ४ हजार ३१८ झाला आहे. यामध्ये सर्वाधिक येवला, इगतपुरी, सिन्नर, सुरगाणा, इगतपुरी, नांदगाव, विंचुर, वणी, पिंपळगाव बसवंत, रावळगाव, उमराळे, भगुर, त्र्यंबकेश्वर, घोटी, देवळाली कॅम्प येथील रूग्ण आहेत.

मालेगावत आज ३५ रूग्ण आढळले आहेत. यामुळे मालेगावचा आकडा १ हजार ४५४ झाला आहेे. जिल्हा बाह्य रूग्णांचा आकडा १६८ झाला आहे.आज दिवसभरात जिल्ह्यातील ५२३ रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा १३ हजार ३३५ वर पोहचला आहे.

आज करोनामुळे २४ तासात विक्रमी ३१ रूग्णांचा मृत्यू झाला. यापुर्वी सर्वाधिक १७ रूग्णांचा एकाच दिवसात मृत्यू झाला होता. यामध्ये २२ नाशिक शहरातील असून सर्वाधिक नवीन नाशिक येथील ४, जेलरोड २, हिरावाडी, पंचवटी २, नाशिकरोड ३, सातपूर २, महात्मानगर, महाजन नगर, मखमलाबादरोड, तारवालानगर, तिवंधा चौक, सरदार चौक, आनंदनगर, गोविंदनगर, काझीपुरा, रेणुकानगर येथील प्रत्येकी एकाचा सामावेश आहे.

करोना रूग्ण वाढत असतानाच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडा मात्र वाढत चालला असून आज एकाच दिवसात नव्याने १ हजार १४६ संशयित रूग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये शहरातील सर्वाधिक ७८६ तर ग्रामिण जिल्ह्यातील २०३ आहेत. जिल्हा रूग्णालय ७, मालेगाव ४४, डॉ. वसंतराव पवार रूग्णालय २१ व होम कोरोंटाईन ८५ रूग्णांचा समावेश आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

एकूण करोना बाधित- १८,४४४

नाशिक- १२५०४

मालेगाव- १४५४

उर्वरित जिल्हा- ४३१८

जिल्हा बाह्य- १६८

एकूण मृत्यू- ५७८

करोनामुक्त- १३,३३५

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com