जिल्ह्यात दिवसभरात ९९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
करोना

जिल्ह्यात दिवसभरात ९९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

मागील चोवीस तासात ८७ रुग्णांची करोनावर मात

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात दिवसभरात ९९ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह ( corona reports positive) आले आहेत. तर मागील चोवीस तासात ८७ रूग्णांनी करोनावर मात केली.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील २४ तासात ९९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक ( Nashik ) शहरातील संख्या ३७ इतकी आहे. आज ग्रामिण भागात ५४ रुग्ण, मालेगाव ( Malegaon ) ०२ तर, जिल्हाबाह्य ०६ रुग्णांची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज ०२ करोना रुग्णांचा मृत्यू झाला ( Death Of Corona Patients ) यात नाशिक ग्रामीण विभागातील १ तर नाशिक शहरातील १ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा ८ हजार ५७० इतका झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com