जिल्ह्यात 99 बाधित; 108 रुग्णांची करोनावर मात

जिल्ह्यात 99 बाधित; 108 रुग्णांची करोनावर मात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 99 करोना बाधित (Corona Positive) आढळून आले आहेत. तर 108 रुग्णांनी करोनावर मात केली आहे....

ग्रामीण भागात (Nashik Rural) 42, नाशिक शहरात (Nashik City) 49, मालेगाव क्षेत्रात (Malegoan) 2 तर जिल्हा बाह्य 6 रुग्ण आढळून आला आहे.

प्रशासनाने बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांच्या ट्रेसिंगचे आदेश दिले आहेत. आरोग्य प्रशासनातर्फे घाबरून न जाण्याचे आवाहन करण्यात आले असून नागरिकांनी शासकीय नियमावलीचे पालन करावे.

गेल्या २४ तासांत जिल्ह्यात 2 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झालेला आहे. दोन्ही रुग्ण नाशिक ग्रामीण परिसरातील आहेत. यामुळे जिल्ह्यात मृत्यूचा आकडा 8 हजार 557 इतका झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com