जिल्ह्यात दिवसभरात ८९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

मागील चोवीस तासात १०४ रुग्णांची करोनावर मात
जिल्ह्यात दिवसभरात ८९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
करोना

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात शहर तसेच ग्रामिण भागात करोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या( Corona Positive Patients ) संख्येत मोठी घट झाली आहे. दिवसभरात ८९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर मागील चोवीस तासात १०४ रूग्णांनी करोनावर मात केली.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील २४ तासात ८९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक ( Nashik ) शहरातील संख्या १६ इतकी आहे. आज ग्रामिण भागात ७० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर मालेगाव येथील ०३ रुग्णांची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज ०३ करोना रुग्णांचा मृत्यू झाला ( Death Of Corona Patients ) . यात नाशिक ग्रामिण विभागात ०१ रुग्ण तर नाशिक शहरातील २ करोना रुग्णांचा समावेश आहे. आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा ८ हजार ४८६ इतका झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com