जिल्ह्यात दिवसभरात ८० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

मागील चोवीस तासात ९९ रुग्णांची करोनावर मात
जिल्ह्यात दिवसभरात ८० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
करोना

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात शहर तसेच ग्रामिण भागात करोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या( Corona Positive Patients ) संख्येत मोठी घट झाली आहे. दिवसभरात ८० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर मागील चोवीस तासात ९९ रूग्णांनी करोनावर मात केली.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील २४ तासात ८० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक ( Nashik ) शहरातील संख्या ३८ इतकी आहे. आज ग्रामिण भागात ३७ , मालेगाव( Malegaon) मध्ये ०१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर जिल्हाबाह्य ०४ रुग्णांची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज ०१ करोना रुग्णाचा मृत्यू झाला ( Death Of Corona Patients ) यात नाशिक शहर विभागातील रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा ८ हजार ५२४ इतका झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com