जिल्ह्यात दिवसभरात ८० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

मागील चोवीस तासात १४६ रुग्णांची करोनावर मात
जिल्ह्यात दिवसभरात ८० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
करोना

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात शहर तसेच ग्रामिण भागात करोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या( Corona Positive Patients ) संख्येत मोठी घट झाली आहे. दिवसभरात ८० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर मागील चोवीस तासात १४६ रूग्णांनी करोनावर मात केली.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील २४ तासात ८० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक ( Nashik ) शहरातील संख्या ५३ इतकी आहे. आज ग्रामिण भागात २१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर जिल्हाबाह्य ०६ रुग्णांची नोंद झाली आहे.

आज जिल्ह्यात ०४ रुग्णांचा मृत्यू झाला ( Death Of Corona Patients ) आहे. यात ग्रामिण भागातील ०१ रूग्ण आहेत, तर नाशिक शहरातील ०३ रूग्णांचा सामावेश आहे.यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा ८ हजार ४८२ इतका झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com