जिल्ह्यात दिवसभरात ६५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

मागील चोवीस तासात ६२ रुग्णांची करोनावर मात
जिल्ह्यात दिवसभरात ६५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
करोना

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात दिवसभरात ६५ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह ( corona reports positive) आले आहेत. तर मागील चोवीस तासात ६२ रूग्णांनी करोनावर मात केली.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील २४ तासात ६५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक ( Nashik ) शहरातील संख्या २२ इतकी आहे. आज ग्रामिण भागात ३९ रुग्ण तर, जिल्हाबाह्य ०४ रुग्णांची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज ०१ करोना रुग्णाचा मृत्यू झाला ( Death Of Corona Patient ) यात नाशिक ग्रामीण विभागातील १ रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा ८ हजार ५६६ इतका झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com