जिल्ह्यात दिवसभरात ६३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

मागील चोवीस तासात ८८ रुग्णांची करोनावर मात
जिल्ह्यात दिवसभरात ६३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
करोना

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात दिवसभरात ६३ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह ( corona reports positive) आले आहेत. तर मागील चोवीस तासात ८८ रूग्णांनी करोनावर मात केली.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील २४ तासात ६३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक (Nashik) शहरातील संख्या २२ इतकी आहे. आज ग्रामिण भागात ३८ रुग्णांची तर, जिल्हाबाह्य ०३ रुग्णांची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज ०२ करोना रुग्णांचा मृत्यू झाला (Death Of Corona Patients) यात नाशिक ग्रामीण विभागातील १ तर नाशिक शहर विभागातील १ रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा ८ हजार ८६१५ इतका झाला आहे.

Related Stories

No stories found.