जिल्ह्यात दिवसभरात ४३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
करोना

जिल्ह्यात दिवसभरात ४३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

मागील चोवीस तासात १५५ रुग्णांची करोनावर मात

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात दिवसभरात ४३ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह ( corona reports positive) आले आहेत. तर मागील चोवीस तासात १५५ रूग्णांनी करोनावर मात केली.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील चोवीस तासात ४३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक (Nashik) शहरातील संख्या २२ इतकी आहे. आज ग्रामिण भागात १६ तर, जिल्हा बाह्य ०५ रुग्णाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज ०१ करोना रुग्णाचा मृत्यू झाला (Death Of Corona Patients) यात नाशिक ग्रामीण विभागातील ०१ रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा ८ हजार ६८७ इतका झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com