जिल्ह्यात दिवसभरात ३८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आज एकही बाधीताच्या मृत्यूची नोंद नाही ; मागील चोवीस तासात ६६ रुग्णांची करोनावर मात
जिल्ह्यात दिवसभरात ३८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
करोना

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात दिवसभरात ३८ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह ( corona reports positive) आले आहेत. तर मागील चोवीस तासात ६६ रूग्णांनी करोनावर मात केली.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील चोवीस तासात ३८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक (Nashik) शहरातील संख्या ११ इतकी आहे. आज ग्रामिण भागात २४ तर, जिल्हा बाह्य ०३ रुग्णाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज एकाही करोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही (Death Of Corona Patients) . आतापर्यंत जिल्ह्यात करोनाने मृत्यु झालेल्यांची संख्या ८ हजार ६९१ इतकी आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com