नाशिक | प्रतिनिधी Nashik
जिल्ह्यात दिवसभरात २१ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह ( corona reports positive) आले आहेत. तर मागील चोवीस तासात ६६ रुग्णांनी करोनावर मात केली.
जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील चोवीस तासात २१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये नाशिक (Nashik) मनपा क्षेत्रातील ११ रुग्ण, नाशिक ग्रामीण क्षेत्रातील ७ रुग्ण, मालेगाव मनपा क्षेत्रातील १ रुग्ण तर, जिल्हाबाह्य ०२ रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आज नाशिक शहर विभागात एक करोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे . (Death of Corona Patient). आतापर्यंत जिल्ह्यात करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ८ हजार ९०३ इतकी आहे.