जिल्ह्यात दिवसभरात १९० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
करोना

जिल्ह्यात दिवसभरात १९० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

मागील चोवीस तासात ११२ रुग्णांची करोनावर मात

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात शहर तसेच ग्रामिण भागात करोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या( Corona Positive Patients ) संख्येत मोठी घट झाली आहे. दिवसभरात १९० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर मागील चोवीस तासात ११२ रूग्णांनी करोनावर मात केली.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील २४ तासात १९० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक ( Nashik ) शहरातील संख्या ४४ इतकी आहे. आज ग्रामिण भागात १३४ , मालेगाव( Malegaon) मध्ये ०१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर जिल्हाबाह्य ११ रुग्णांची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज ०४ करोना रुग्णांचा मृत्यू झाला ( Death Of Corona Patients ) यात नाशिक ग्रामिण विभागातील ०३ रुग्णांचा तर नाशिक शहर विभागातील ०१ रुग्णांचा समावेश आहे समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा ८ हजार ५१३ इतका झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com